31st december celebration saamtv
महाराष्ट्र

31st December : रात्री ९ नंतर बाहेर पडणे आणि मद्य पिऊन गाडी चालवणे पडेल महागात!

कोरोनाचे नियम मोडल्यास पर्यटक, हॉटेल, कॉटेज, लॉज, हॉल व्यवसायिकांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- राजेश भोस्तेकर

रायगड : नववर्ष स्वागताला रात्री नऊ नंतर बाहेर पडलात तर जिल्ह्यात पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मद्य प्राशन करून वाहन चालविल्यास जेलची हवाही खावी लागणार आहे. कोरोनाचे नियम मोडल्यास पर्यटक, हॉटेल, कॉटेज, लॉज, हॉल व्यवसायिकांनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

हे देखील पहा :

त्यामुळे नववर्ष स्वागतासाठी घराच्या बाहेर पार्टीचे बेत आखत असाल तर जरा सावधान...!अन्यथा कायदेशीर कारवाई झालीच म्हणून समजा. नववर्षाच्या अनुषंगाने आणि कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

नववर्ष स्वागताला (New Year Celebration) रायगडात मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. राज्यात वाढत असलेल्या कोरोनामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात (Raigad) येणाऱ्या पर्यटकांची अँटीजन तपासणी करण्यात येत असून दोन डोस घेतले आहेत का, मास्क परिधान केले आहेत का याची तपासणी नाक्यांनाक्यावर केली जात आहे. जिल्हा पोलिसांकडून भरारी पथक तैनात केली आहेत. ठिकठिकाणी नाका बंदी करण्यात आली आहे. रात्री 9 नंतर सार्वजनिक ठिकाणी, समुद्रकिनारी पाच पेक्षा अधिक जण एकत्रित आल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. हॉल, हॉटेल, लॉज, रिसॉर्ट, कॉटेज यावरही पोलिसांची पाळत राहणार आहे.

नववर्षाच्या स्वागत काळात महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असून सध्या वेशात पोलीस (police) तैनात करण्यात आले आहेत. रात्री मद्य (Drink) प्राशन करून वाहन चालवताना मिळाल्यास गुन्हा दाखल करून अटक केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी, पर्यटकांना कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे नववर्षाचा आपला पहिला दिवस कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी घरातच नववर्ष स्वागत करणेच योग्य आहे हे विसरून चालणार नाही.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच अजित पवारांना मोठा धक्का, बडा नेता भाजपचं 'कमळ' घेणार हाती

Maharashtra Live News Update: नगर पालिके प्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकीत रायगडमध्ये महायुती तुटण्याचे खा. तटकरे यांचे संकेत

Virat Kohli: जगात भारी, विराट कोहली! ODI रँकिंगमध्ये पुन्हा नंबर १, रोहित शर्माची जागा घेतली

Gajra Hairstyles: मराठमोळा नखरा अन् केसांत माळा मोगऱ्याचा गजरा, या आहेत 5 सुंदर हेअरस्टाईल्स

Immunity Boost: आहारात या 3 पदार्थांचा करा समावेश, रोगप्रतिकारक शक्ती अन् Metabolism वाढेल; डॉक्टरांनी दिला सल्ला

SCROLL FOR NEXT