औरंगाबाद : एका पंधरा वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करून व्हिडीओ शूटिंग केले, त्यानंतर जर कुणाला सांगितले तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची घटना औरंगाबादमध्ये समोर आलीय. याप्रकरणी आरोपीला वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC) पोलिसांनी अटक केलीय. शिवण क्लाससाठी जाणाऱ्या एका 15 वर्षीय विद्यार्थिनीला पंचवीस वर्षीय तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे त्यावेळी मोबाईल मध्ये काढण्यात आलेली चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देत हा प्रकार दोन महिन्यापासून सुरू होता.
हे देखील पहा :
आईने मुलीची बॅग तपासल्याने ही घटना समोर आली. त्यानंतर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात केली आहे. पंधरा वर्षीय विद्यार्थीनी आई व सावत्र वडीलासह बजाजनगर येथे राहते. तिला शिवणक्लास लावला असून ती अंदाजे दोन महिन्यापुर्वी स्कुटीवर क्लासवरुन घरी असताना तीची स्कुटी मोहाटादेवी चौकात बंद पडली. त्यामुळे तीने तेथे अभा असलेल्या अरविंद सदावर्ते (25) याच्या मोबाईलवरून (Mobile) आईला फोन करून माहिती दिली होती. तेव्हा पासून तीचा मोबाइल नंबर आरोपीकडे होता.
त्यामुळे त्याने अल्पवयीन विद्यार्थिनीला फोन करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तेव्हा पासून दोघेही भेटत असत. एक दिवस त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या रुमवर नेऊन तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. विशेष म्हणजे त्यावेळी त्याने मोबाइल मध्ये चित्रफित (Video) तयार केली. ही चित्रफित तिला दाखवून ती व्हायरल (viral) करण्याची धमकी देत अरविंद सदावर्ते याने तिच्यावर वेळावेळा अत्याचार (Rape) केला. सुमारे दहा ते बारा दिवसापुर्वी पिडीत मुलीच्या आईने मुलीची बॅग तपासली असता त्यामध्ये पॉझिटिव्ह असलेली प्रेग्नंसी किट व गोळ्या आढळून आल्या.
याबाबद तिला विचारले असता तीने सांगितले की, ज्या दिवशी स्कुटी बंद पडली होती. त्यादिवशी ज्या मुलाने फोन करून माहिती दिली होती. त्याने अत्याचार करून चित्रफित काढली. ती व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वेळोवेळी आत्याचार केल्याचे सांगितले. दरम्यान पिडीत मुलीची आई, वडील, आईची मैत्रीण व गुरु भाऊ यांनी पिडीत मुलीसह आरोपीच्या रुमवर धाव घेतली. त्याला जबाब विचारात त्याचा मोबाईल तपासला असता त्यात ती चित्रफित असल्याचे दिसून आले.
यावेळी अरविंद सदावर्ते याने मी तुमच्या मुलीशी लग्न करणार आहे. असे म्हणाला. त्यामुळे त्यांनी तुझ्या आई वडीलांना घेऊन ये, तोपर्यत चित्रफित असलेला मोबाईल आमच्याकडे राहिल. असे सांगितले. त्यानंंतर सदावर्ते हा त्याच्या मुळ गावी दाभा, पोस्ट ईटोली ता.जितुंर जि. परभणी येथे निघुन गेला. तो परत न आल्याने मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.