औरंगाबाद : आज अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यात नाताळाच्या दिवशी राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचवणारे तसेच ख्रिश्चन व हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखविणारे सुयश शिवपुरी यांनी ख्रिश्चन व हिंदू धर्मियांच्या भावना दुखविल्या बद्दल जाहीर माफी मागावी. अन्यथा नाविलाजास्तव आम्हाला त्यांच्या विरूद्ध कलम 295-अ व 34 नुसार धार्मिक भावना दुखावल्याबद्दल राज्यभर गुन्हे दाखल करावे लागतीलअसा इशारा अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे. पैठणमधील खोट्या धर्मांतराच्या बातमीने केवळ ख्रिश्चन धर्माचीच नाही तर तमाम हिंदू बांधवांच्या ही भावना दुखावण्याचे काम सुयश शिवपुरी यांनी केले आहे असा आरोप महासंघाच्या वतीने करण्यात आला आहे.
हे देखील पहा :
संत एकनाथ महाराज यांचे 14 वे 15 वे वंशज रावसाहेब महाराज गोसावी, पैठणचे वेदशास्ञ संपन्न कमलाकर गुरू शिवपुरी, योगेश महाराज पालखीवाले, रेखा कुलकर्णी, किशोर चव्हाण, समिर शुक्ल, शाम पंजवाणी, संजय वालतुरे, शाम यादव या लोकांना अंधारात ठेवून खोट्या धर्मांतराचे ढोंग रचण्यात आले. त्यामुळे हिंदू व ख्रिश्चन बांधवांच्या धार्मिक भावना दुखविल्या आहेत. तसेच संपूर्ण भारतात प्रसिध्द असणाऱ्या नाथमंदिरात शांतीब्रम्ह महाराजांच्या समाधी समोर हा फसवा धर्मांतर विधी पार पडला. त्यात हिंदू बांधवांची ही त्यांनी फसवणूक केलेली आहे.
कालच ज्यांनी पैठण ला धर्मांतर केले होते. त्यांनी त्यांना काहीच माहिती नव्हते असे सांगितले व आम्ही हिंदूच आहोत. त्यामुळे हा बनाव ज्यांनी घडवून आणला त्या सुयश शिवपुरी यांनी तात्काळ हिंदू व ख्रिश्चन धर्मियांची माफी मागावी नसता अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ संपूर्ण राज्यभर पोलिसात त्यांच्या वर गून्हे दाखल करणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांनी दिलेली आहे.
जर, माफी नाही मागितली तर महासंघाचे राज्यभरातील कार्यकर्ते शिवपुरी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच चालू करतील असा इशारा प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे, युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष अमोल शिंदे राज्य उपाध्यक्ष संजीव कांबळे- ठाणे, डाँ.वंदना बेंजामिन-नागपुर, आनंद म्हाळूंगेकर-कोल्हापूर, रेव्ह.वर्षा सिंग-दिल्ली, विल्यम चंदनशीव-पुणे, राजेश थोरात-अ.नगर, सावन वाघमारे, अँड.डँनिएल ताकवाले-औरंगाबाद, उल्हास भोसले-परभणी, विवेक निर्मळ-जालना, रितेश गोर्डे-पुणे, अँड.प्रकाश बेंजामिन-नागपुर, मुकेश घाटगे-जालना, जयंत रायबोर्डे- बुलढाणा, राज एडके-मुंबई यांनी दिला आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.