Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Maharashtra Political News saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News : नव्या वर्षात नवीन मुख्यमंत्री मिळणार; महाराष्ट्रातील बड्या नेत्याची भविष्यवाणी

Nandkumar Joshi

नितीन पाटणकर, पुणे | 09 डिसेंबर, 2023

Balasaheb Thorat On CM Eknath Shinde :

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अपात्रता सुनावणी आणि राज्याच्या विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन, तसेच राज्यातील सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाकयुद्ध सुरू असताना राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. राज्याला नव्या वर्षात नवीन मुख्यमंत्री मिळेल आणि तो महाविकास आघाडीचाच असेल, असा दावा त्यांनी केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येत्या नवीन वर्षात राज्यात मोठ्या घडामोडी अपेक्षित आहेत. त्यात राज्याला नव्या वर्षात नवीन मुख्यमंत्री मिळेल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत बाळासाहेब थोरात यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात बोलताना त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या संभाव्य विधानसभा निवडणुकांचाही संदर्भ दिला.

पुढील वर्षी महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असेल, असा दावा त्यांनी केला. पुढील वर्षी मुख्यमंत्री बदलतील आणि पुढचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच असेल, असे थोरात म्हणाले.

शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीवर भाष्य

बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. कायदेशीर बाबींवर मी बोलणे योग्य होणार नाही. मात्र, जो वेळ लागतोय तो योग्य नाही. इतका वेळ का लागतोय याबाबत गावातील एखाद्या मुलालाही विचारलं तरी तो कारण सांगेल, असा टोला त्यांनी लगावला.

अजित पवारांना पत्र लिहिण्याची गरजच काय?

नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून तसे कळवले होते. त्यावरही थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. नवाब मलिक यांच्यासंदर्भात पत्र लिहिण्याची गरज काय होती? दोघेही नेते एकत्र असतात. सभागृहातही एकाच ठिकाणी बसतात. बैठकांमध्येही एकत्र असतात, मग पत्र लिहिण्याची गरज काय, असा सवाल त्यांनी केला.

भाजपची राजकारण करण्याची एक पद्धत आहे. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करतात. विरोधकांवर कारवाया होतात, पण भाजपमध्ये गेल्यावर कारवाया होत नाहीत, अशी टीकाही थोरात यांनी केली.

शेताच्या बांधावर जाऊन फक्त फोटोसेशन केल्याची टीका

अवकाळी पावसामुळं राज्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी काल नुकसानीचा पाहणी दौरा केला. त्यावर थोरात यांनी टीकास्त्र सोडलं. हे वर्ष शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे. अवकाळी पावसामुळं राज्यभरात शेतीचं खूप नुकसान झालं आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. पण हे सरकारने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन फक्त फोटोसेशन केलं, अशी टीकाही थोरात यांनी केली.

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. मात्र, अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. त्या तिघांमध्ये आपांपसात वाद सुरू आहे. त्यांचे जनतेकडे लक्ष नाही. राज्यात अनेक पदे रिक्त आहेत. नोकरभरती होत नाही. भरती करायला गेले तर घोटाळे होतात. पेपरफुटी होते. सरकार आहे की नाही, अशी परिस्थिती राज्यात असल्याची टीकाही थोरात यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT