Shirish Valsangkar Saam tv
महाराष्ट्र

Shirish Valsangkar : न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

Shirish Valsangkar News : न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा केला आहे.

विश्वभूषण लिमये

न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात त्यांच्या रुग्णालयातील महिलेवर गंभीर आरोप केले जात आहेत. मात्र, या आरोपी महिलेच्या वकिलाने मोठा खुलासा केला आहे.

आरोपी मनीषा माने यांचे वकील प्रशांत नवगिरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी वकील प्रशांत म्हणाले, '१७ तारखेला आरोपी महिलेने एक मेल डॉ. शिरीष वळसंगकर यांना केला होता. त्यामध्ये महिलेने असे सांगितले होते की, माझी पगार कपात केली जात आहे. काही व्यक्तींचा ऐकून त्याच्यावर आरोप केले जातात. अधिकार कमी केले जात आहेत. या संदर्भात तिने तक्रार केली होती'.

'या मेलच्या अनुषंगाने डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी तिला बोलावून घेतलं होतं. त्यावेळी महिलेने मेल करून चूक झाल्याची कबुली दिली. त्यावेळी माफी देखील मागितली होती. त्यानंतर डॉक्टरांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याचे एफआयआरमध्ये नोंद आहे. महिला एवढी त्रास देणारी होती तर निश्चितच त्याच दिवशी तिला बोलावण्यात देखील आलं नसतं, असे वकील प्रशांत यांनी म्हटलं.

'डॉक्टरांची चिठ्ठी जप्त झाली आहे. त्यातील हस्ताक्षर नमुने घेऊन तपासाला पाठवायचे आहेत, असं मत पोलिसांनी कोर्टासमोर मांडले. प्रख्यात मेंदूरोग तज्ज्ञ असणारे डॉक्टर या कारणामुळे आत्महत्या करणे शक्य नाही. या प्रकरणात वस्तुस्थिती वेगळी असून ते बाहेर येऊ नये यासाठी खोटी केस मनीषा माने यांच्यावर करण्यात आली आहे असा युक्तिवाद आम्ही मांडला आहे, असे वकिलांनी सांगितलं.

'दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. जेव्हा कोठडी संपेल, तेव्हा आम्ही जामीनासाठी अर्ज करू. मनीषा माने यांच्यावर एकही गैरव्यवहाराचा आरोप नाही. आरोप एवढाच आहे की, त्यांनी डॉक्टरांना मेल केला. त्यात त्यांनी डॉक्टरांवर आरोप केले की माझा पगार कपात करू नका. मी फार जुनी कर्मचारी आहे. एक दिवसाचा पगार कपात केला एवढाच विषय आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT