
डॉ. मुरलीप्रसाद शर्मा अर्थात मुन्नाभाई. कल्पना करा तुम्हाला हार्ट अटॅक आला आणि तुम्हाला विश्वासाने एका डॉक्टरच्या हाती सोपवलं आणि तो डॉक्टरच बोगस निघाला तर होय, अगदी असंच घडलंय. स्वतःला डॉ. एन जोन केम म्हणवणाऱ्या बोगस डॉक्टरनं 15 हार्ट सर्जरी केल्या आणि त्यातील तब्बल 7 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय..मात्र हे प्रकरण काय आहे? पाहूयात.
बोगस नरेंद्रचं लंडनमधील प्रसिद्ध डॉक्टर एन जॉन केम नावानं सर्जन म्हणून काम
अडीच महिन्यात 15 जणांवर हार्ट सर्जरी,7 मृत्यू
रुग्णांच्या मृत्यूनंतर बोगस डॉक्टर नरेंद्रनं काढला पळ
प्रयागराजमधून पोलिसांनी आवळल्या बोगस डॉक्टर नरेंद्रच्या मुसक्या
मध्यप्रदेशातील दमोह जिल्ह्यात मिशन हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये लंडनमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. एन जोन केम नावानं नरेंद्र यादव नावाच्या बोगस डॉक्टरनं सर्जरी केल्या. मात्र तब्बल 7 जणांचा जीव घेतल्यानंतर ही बोगसगिरी उघड झालीय. मिशन हॉस्पिटलमधील या धक्कादायक घटनेनंतर पोलीस बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडतीलही. मात्र कारवाई झाली तरी यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे आणि डॉक्टरांच्या बोगसगिरीमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचं विश्व असलेल्या व्यक्तीला परत आणता येईल का? हा प्रश्न कायम आहे.
नरेंद्र यादव गेल्या 20 वर्षांपासून भारतात वास्तव्य करतोय. बनावट नावानं रुग्णांवर उपचार करतोय. त्यामुळे गेली 20 वर्ष यंत्रणेला गुंगारा देणाऱ्या या बोगस डॉक्टरनं संपूर्ण यंत्रणेवरच सवाल उपस्थित केलेत. इतकी वर्ष यंत्रणा झोपली होती का ? बोगस डॉक्टरनं किती जणांच्या आय़ुष्याशी खेळ केला? असे अनेक सवाल उपस्थित होतायत. देशभरात 2 ते 3 लाख बोगस डॉक्टर असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे झोपलेली यंत्रणेला कधी जागी होणार हेच पाहायचं.मात्र या बोगस डॉक्टर नरेंद्रला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करतायत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.