NEET cut off 177 student scored 166 depression case saam tv
महाराष्ट्र

NEET मध्ये फक्त 11 गुणांनी हुकली सीट; अहिल्यानगरमध्ये 19 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल

Ahilyanagar Karjat Student End Life Due To NEET Marks: अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे नीट फेरपरीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने 19 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परीक्षेच्या तणावामुळे आलेल्या नैराश्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे.

Omkar Sonawane

सुशील थोरात, साम टीव्ही

अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सुरेश सांगळे या विद्यार्थिनीने नीट फेरपरीक्षेमध्ये कमी गुण मिळाले म्हणून राहत्या घरामध्ये गळफास घेऊन जीवन संपवले आहे. अंकिता सुरेश सांगळे (वय 19) असे विद्यार्थीनीचे नाव असून तिला फेर परीक्षेत 166 गुण मिळाले होते. अंकिताने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहली असून कमी गुण मिळाल्याने नैराश्य आल्याचे तिने या नोटमध्ये म्हटले आहे.

अंकिता सुरेश सांगळे हिने 21 जून रोजी नीटची फेरपरीक्षा दिली होती. या परिक्षेत तिला 166 गुण मिळाले. कट ऑफ गुण हे 177 होते. अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून अंकिता मानसिक तणावात होती. 25 जुलैला वडील आणि भाऊ पंढरपूर येथे दर्शनासाठी गेलेले होते. घरामध्ये आई होती. परंतु ती कामामध्ये व्यस्त होती. त्यावेळी अंकिताने तिला अभ्यासासाठी दिलेल्या स्वतंत्र खोलीत गळफास घेतला. बराच वेळ झाला तिचा काही आवाज किंवा हालचाल दिसली नाही म्हणून आईने खोलीचा दरवाजा उघडून पाहिलं तर अंकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

अंकिताने सुसाईड नोट लिहली असून त्यात तीने आपल्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे. परीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याने मला नैराश्य आले आहे. डॉक्टर होण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले नाही. या आत्महत्येसाठी माझे आई-वडील भाऊ यापैकी कोणालाही जबाबदार धरू नये, असे तिने चिठ्ठीत म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cabinet Expansion : श्रीकांत शिंदेंना शिक्षण मंत्रालय मिळणार? शिंदेंसेनेच्या नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

Health Care: रोज कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने खरंच बेली फॅट कमी होतं का? तज्ज्ञ काय सांगतात?

Chanakya Niti : या ५ चुका करता म्हणून पैसा टिकत नाही

रात्री दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानकारक? पावसाळ्यात काय काळजी घ्यावी

Maharashtra News Live Update: अकोल्यात पीडित मुलीच्या मृतदेहासह रस्ता रोको; आरोपी पोलिस कर्मचाऱ्याच्या अटकेची मागणी

SCROLL FOR NEXT