DelimitationBill saam tv
महाराष्ट्र

डिलिमिटेशनवर राष्ट्रवादीची भूमिका अद्याप ठरलेली नाही- खासदार धैर्यशील मोहिते पाटील

Dhairyasheel Mohite Patil statement on Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका अद्याप ठरलेली नाही. आठही खासदारांची मते जाणून घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेणार असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.

Omkar Sonawane

डिलिमीटेशन विधेयकावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची भूमिका अद्याप निश्चित झालेली नाही. पक्षाच्या आठही खासदारांची एकत्रित बैठक झाल्यानंतर आणि सर्वांची मते जाणून घेतल्यानंतरच पक्षाची अधिकृत भूमिका ठरवली जाईल, असे स्पष्ट विधान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे. डिलिमिटेशनच्या मुद्यावर पक्षावर होत असलेल्या टीकेलाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

डिलिमिटेशन विधेयकाचा मसुदा काल रात्री 10 वाजल्यानंतर जाहीर झाला. मात्र अद्याप पक्षाची किंवा आठही खासदारांची एकत्रित बैठक झालेली नाही. त्यामुळे पक्षाने या विधेयकाला पाठिंबा दिला किंवा विरोध केला, असे ,म्हणणे चुकीचे असल्याचे मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले. मसुद्याचा सविस्तर अभ्यास करून त्यातील शंकांवर चर्चा केली जाईल आणि त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. या मुद्द्यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सकाळीच पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, काँग्रेस नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या मदतीशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एकही खासदार निवडून आला नसता, हे विधान चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

एकमेकांच्या साथीशिवाय महाविकास आघाडीचे सरकारही स्थापन झाले नसते. तसेच खासदार आणि आमदारही निवडून आले नसते. त्यामुळे आघाडीतील घटक पक्षांनी एकमेकांचा आदर राखला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आमच्या आठही खासदारांची वैयक्तिक मते जाणून घ्या आणि त्यानंतरच प्रतिक्रिया द्या, असेही त्यांनी सुनावले.

काँग्रेसकडून झालेल्या टीकेबाबत पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करणार असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे तक्रार केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच संजय राऊत यांच्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. ऑनलाइन बैठकीला उपस्थित राहण्याची इच्छा होती. मात्र, पक्षावर चुकीच्या पद्धतीने टीका होत असल्याने बैठकीला उपस्थित राहू नका, असे इतरांनी सांगितल्याचा खुलासाही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लोकसभेच्या जागा 850 झाल्या तर राज्यसभेचं महत्त्व संपणार? घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी व्यक्त केली भीती

Nagpur : वर्गणीसाठी विद्यार्थ्याला थेट परीक्षेत नापास करण्याची धमकी; नागपुरातील शाळेतील शिक्षिकेचा कारनामा

Maharashtra News Live Update : अकोल्यात जिनिंग-स्पिनिंग मिलला भीषण आग; कोट्यवधींचा धागा जळून खाक

असं सौंदर्य पाहिलं अन् हृदय धडधडू लागलं...

Shocking : बाईक, सोन्याच्या अंगठीसाठी छळ; पोलीस ठाण्यात सासरच्यांविरुद्ध तक्रार केली, घरी परतली अन्....

SCROLL FOR NEXT