लोकसभेच्या जागा 850 झाल्या तर राज्यसभेचं महत्त्व संपणार? घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी व्यक्त केली भीती

Ulhas Bapat On Delimitation : लोकसभेच्या जागा वाढून राज्यसभेच्या जागा कायम राहिल्यास संसदेतील दोन्ही सभागृहांच्या संख्याबळातील अंतर वाढू शकते. यामुळे राज्यसभेच्या भूमिकेवर परिणाम होण्याची शक्यता उल्हास बापट यांनी व्यक्त केलीय.

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

देशात लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा म्हणजेच डिलिमिटेशनचा मुद्दा चर्चेत आहे. त्याचदरम्यान घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी एक महत्त्वाचा घटनात्मक प्रश्न उपस्थित केलाय. लोकसभेच्या जागा वाढवून ८५० केल्या गेल्या, मात्र राज्यसभेच्या जागा २५० इतक्याच राहिल्या, तर देशाच्या संघराज्य व्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी शंका उल्हास बापट यांनी व्यक्त केली आहे. या संभाव्य बदलाला घटनात्मक आव्हान दिले जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवलीय.

लोकसभेच्या जागा वाढल्या तर राज्यसभेचं महत्त्व कमी होणार?

लोकसभेत देशातील नागरिकांचं प्रतिनिधित्व असतं, तर राज्यसभेत राज्यांचं प्रतिनिधित्व केलं जातं. अशा परिस्थितीत लोकसभेचं संख्याबळ मोठ्या प्रमाणात वाढलं आणि राज्यसभेचं संख्याबळ कायम राहिलं, तर संसदेतील दोन्ही सभागृहांमधील समतोलावर परिणाम होऊ शकतो, असं बापट यांनी साम टीव्ही बोलताना स्पष्ट केलं. नव्या बदलामुळे लोकसभेचं वर्चस्व वाढून राज्यसभेचं महत्त्व कमी होण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणालेत. भारतीय राज्यघटनेतील संघराज्य व्यवस्था ही मूलभूत रचनेचा भाग असल्याचं बापट यांनी नमूद केलं. १९७३ मधील केशवानंद भारती खटल्याचा संदर्भ देत संसदेला राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार असला, तरी राज्यघटनेच्या मूलभूत रचनेत बदल करता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.