नागपुरात अवघ्या ३०० रुपयांसाठी दहावीच्या विद्यार्थ्याला नापास करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या कार्यक्रमासाठी पैसे न दिल्याने शिक्षिकेने विद्यार्थ्याला परीक्षेत नापास करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील एका शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याकडे कार्यक्रमासाठी ३०० रुपये मागण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्याने पैसे न दिल्याने शिक्षिका मंजुषा गेडाम यांनी त्याला परीक्षेत नापास करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाही, तर शिक्षिकेने विद्यार्थ्याचा चेहरा हाताने पकडल्याचाही आरोप आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी निर्माण झाली. प्रकरण गंभीर असल्याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे सीताबर्डी पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.