raigad politics  Saam tv
महाराष्ट्र

रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो गायब; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

Raigad Political News : रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो गायब झाल्याचे समोर आलं आहे. यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Vishal Gangurde

राष्ट्रवादीत राजकीय घडामोडींना वेग

अशोक खरात प्रकरणावरून सुनील तटकरे लक्ष्य

बॅनरवरून पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब चर्चांना उधाण

सचिन कदम, साम टीव्ही

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अशोक खरात प्रकरणावरून सुनील तटकरे यांना लक्ष्य केलं जात आहे. तटकरेंवर टीका केली जात असताना रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दिवंगत अजित पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब झाल्याचे समोर आलं आहे. या बॅनरवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर पक्षफोडीचे वेगवेगळे आरोप होत आहेत. तटकरेंचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रायगडमध्ये बॅनरवरून राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब झाल्याचे दिसत आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रचार सभांच्या बॅनरवर देखील केवळ खासदार सुनिल तटकरे यांच्या व्यतिरिक्त कोणाचेही फोटो छापण्यात आले नव्हते.

मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघांतील इंदापूर येथे नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावरील बॅनरवर खासदार सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो लावण्यात आले.

रायगडच्या इंदारपूरमधील या बॅनरवर अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षश्रेष्ठींचे फोटो लावण्यात आले नाहीत. रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून पक्षश्रेष्ठींचे फोटो गायब होत असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

बॅनरवरील गायब फोटोवरून सुनिल तटकरे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या बॅनरवरून शरद पवार गट तटकरेंना पुन्हा लक्ष्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trendy Simple Mangalsutra: ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी ट्राय करा लाइटव्हेट आणि साधे ट्रेंडी मंगळसूत्र डिझाईन्स

TCS Case: घरात बुरखा आणि धार्मिक पुस्तके सापडणे कधीपासून अवैध झाले? असदुद्दीन ओवेसींकडून निदा खानचं समर्थन

Kitchen Hack : उन्हाळ्यात मडक्यात पाणी पिताय? थांबा त्यापूर्वी 'हे' आधी करा

Gunaratna Sadavarte : जालन्यात मोठा गोंधळ; गुणरत्न सदावर्ते यांच्या कारवर मनसैनिकांकडून शाईफेक

Shubman Gill: सूर्यानंतर गिलचंही वनडे कर्णधारपद जाणार? कोण घेणार प्रिन्सची जागा? या खेळाडूचं नाव चर्चेत

SCROLL FOR NEXT