Manasvi Choudhary
पावसाळ्यात हवेत दमटपणा असतो ही दमट हवा एसीच्या संपर्कात आल्यास एसीमध्ये बुरशी आणि जिवाणूंची वाढ होऊ शकते. यामुळे एसीचा ड्रेन पाईच चोक होतो यामुळे पाणी बाहेर जात नाही आणि आत साचून राहते. ज्यामुळे एसी सुरू केल्यानंतर दुर्गंधी पसरते.
एसीच्या एअर फिल्टरमध्ये धूळ आणि घाण साचल्याने पावसाळ्यात बुरशी वाढते ज्यामुळे एसीमधून दुर्गंधी येते. आर्द्रतेमुळे एसीमध्ये विद्युत शॉर्ट सर्किट होऊ शकतो यामुळे दुर्गंध पसरतो.
एसीमधून कुबट येणारा वास आरोग्यासाठी घातक ठरू शकतो यामुळे अस्वस्थता वाढते. खोलीमध्ये बसून कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही.
पावसाळ्यात एसीमधून दुर्गंधी का येते आणि त्यावर काय उपाय करावे? हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
एसी पूर्णपणे बंद करण्यापूर्वी किमान १० ते १५ मिनिटे एसी ड्राय मोड किंवा फॅन मोडवर ठेवा यामुळे एसीच्या आतील भागात साचलेला सर्व ओलावा शोषला जातो, आतील भाग पूर्णपणे सुकतो
पावसाळ्यात एसीचे एअर फिल्टर वेळोवेळी स्वच्छ करा. फिल्टर स्वच्छ राहिल्याने हवेचा प्रवाह चांगला राहतो, धूळ साचत नाही
एसीच्या आतील भागात कुठेही पाणी साचणार नाही याची खात्री करा. जर ड्रेन पाईप ब्लॉक असेल, तर तो त्वरित साफ करून घ्या
पावसाळ्यात एसीच्या सर्व्हिसिंग दरम्यान किंवा स्वतः साफ करताना आतील भागांवर बुरशीनाशक स्प्रे मारा यामुळे बुरशी पकडणार नाही.
पावसाळा सुरू होताच किंवा पावसाळ्यात एकदा एसी सर्व्हिसिंग करून घ्या.