Manasvi Choudhary
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे असते. पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे अनेक संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात.
डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकला आणि पोटाचे विकार या दिवसांत वेगाने पसरतात. अशा वेळी या आजारांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे महत्त्वाचे आहे.
तुमच्या रोजच्या जेवणात आले, लसूण आणि हळद यांचा वापर जास्तीत जास्त करा. या पदार्थांमधील अँटी-बायोटिक्स, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आजारांशी लढण्यासाठी मदत करतात.
पावसाळ्यात सर्दी, खोकला होण्याचा धोका जास्त असतो. यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीचा काढा किंवा आल्या-तुळशीचा गरमागरम चहा पिणे फायदेशीर ठरते.
पावसाळ्यात भाज्यांवर कीटक आणि बॅक्टेरिया जमा होतात. यामुळे पालेभाज्या आणि फळे स्वच्छ धुवून खा. कच्च्या भाज्या किंवा कच्चे सॅलड खाणे टाळावे. भाज्या नेहमी शिजवून खा.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आहारात लिंबू, आवळा आणि संत्री यांसारख्या फळांचा समावेश करा.
पावसाळ्यात केवळ आहारच नाही तर पुरेशी झोप आणि नियमित योगासने करणे महत्वाचे आहे.
पावसाळ्यात रस्त्यावरील उघड्यावरचे, जास्त तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे टाळा. हे पदार्थ पचायला जड असतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.