Manasvi Choudhary
चुकीच्या जीवनशैली , वेळेचा अभाव आणि सतत बसण्याची सवयीमुळे वजन वाढणे, पोटावर चरबी जमा होण्याच्या समस्या निर्माण होतात.
आजकाल अनेकजण वजन कमी करण्यासठी जीम, योगा लावतात मात्र अनेकांना या क्लासेसला जायला वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही खुर्चीवर बसून सोप्या पद्दतीने काही योगासने करू शकता ज्याला चेअर योगा असे म्हणतात.
जे लोक ऑफिससमध्ये बराच वेळ बसून काम करतात किंवा ज्यांची शारीरीिक हालचाल होत नाही अश्यांसाठी ही योगासने महत्वाची आहेत.
चेअर ट्विस्ट हा योगा करताना तुमची कंबर, पाठ आणि पोटाच्या स्नायूंचा आराम होतो.
कसा करायचा योगा?
पाठीचा कणा सरळ ठेवून खुर्चीवर बसा. श्वास आत घ्या आणि कंबर हळहळू उजवीकडे वळवा. दोन्ही हात खुर्चीच्या हँडलेवर ठेवा. ५ सेंकद हा योगा करा. पुन्हा डाव्या बाजूने सेम करा.
चेअर क्रंचेस या योगामुळे पोटाचे स्नायू लवचिक होण्यास मदत होते आणि शरीराची ऊर्जा वाढते.
कसा करावा योगा?
खुर्चीत पाठ सरळ ठेवून बसा. दोन्ही हात डोक्यामागे ठेवा आणि पाय जमिनीपासून थोडे वर उचला. गुडघे छातीजवळ आणा आणि नंतर खाली न्या. दहा वेळा हा योगा करा.
नी टू एल्बो हा योगा केल्याने पोटाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.
कसा करायचा योगा?
ताठ बसून उजवा गुडघा वरती उचला आणि त्याला डाव्या कोपरा टच करा. सेम उजव्या बाजूने असा योगा करा. यामुळे पोटाच्या चरबीवर ताण येईल.
चेअर बँड योगा कमरेवरची चरबी करण्यासाठी हा योगा अधिक फायदेशीर आहे.
कसा करायचा योगा?
खुर्चीवर बसून एक हात डोक्यावर ठेवा दुसऱ्या हाताने खुर्ची धरा आणि त्यानंतर थोडेसे वरती व्हा. ४ ते ५ वेळा सेम करा.
बसून पाय उचलल्याने पोटाच्या खालच्या बाजूची चरबी कमी होण्यास मदत होते.
खुर्चीच्या कडेवर बसून आणि पाय जमिनीपासून वर उचला. काही सेकंद पाय तसेच ठेवा नंतर पाय खाली करा. असे १० वेळा केल्याने तुम्हाला फरक दिसून येईल.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.