व्हाईट राईस की ब्राऊन राईस? आरोग्यासाठी कोणता आहे जास्त फायदेशीर? जाणून घ्या

Manasvi Choudhary

भात

भात हा आपल्या रोजच्या आहारातला महत्वाचा घटक आहे. आपल्यापैकी अनेकांचे भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही.

THALI

शरीराला मिळते उर्जा

भात खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते, पण आजकाल फिटनेस आणि आरोग्याच्या काळजीसाठी अनेक जण पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस खातात. मात्र तुम्हाला माहितीये का आरोग्यासाठी नेमका कोणता भात अधिक फायदेशीर आहे?

White Rice vs Brown Rice

पोषणतत्वे

पांढरा तांदूळ आणि तपकिरी तांदूळ यांच्यामधील फरक म्हणजे तपकिरी तांदूळ हा पॉलिश केलेला नसतो त्यामुळे या तांदळात अधिक पोषणतत्वे असतात.

पांढरा तांदूळ पॉलिश केलेला असतो म्हणजेच त्याचे बाहेरीच थर काढलेले असते यामुळे तो अधिक पांढरा आणि मऊ दिसतो.

White Rice vs Brown Rice

पौष्टिक गुणधर्म

तपकिरी तांदळामध्ये फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. फायबरमुळे शरीराची पचनसंस्था मजबूत होते.

White Rice vs Brown Rice

आरोग्यासाठी कसा होतो फायदा?

तपकिरी तांदूळ खाल्ल्याने रक्तातील साखर हळूहळू वाढते यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी तपकिरी तांदूळ खाल्ले तर फायदा होतो.

पांढरा तांदूळ हा लवकर पचतो यामुळे ज्यांची पचनक्रिया कमकुवत आहे अश्या व्यक्तींनी पांढऱ्या तांदळाचे सेवन करणे फायदेशीर असेल.

White Rice vs Brown Rice

पांढरा तांदूळ खाल्ल्याने रत्तातील साखर झपाट्याने वाढू शकते यामुळे डायबिटीज असणाऱ्यांनी पांढऱ्या तांदळाचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

White Rice vs Brown Rice

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: पार्लरमध्ये जाण्याची गरज कशाला? 'या' ५ सोप्या स्टेप्सने घरीच करा फेशियल; चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो!

येथे क्लिक करा...