पार्लरमध्ये जाण्याची गरज कशाला? 'या' ५ सोप्या स्टेप्सने घरीच करा फेशियल; चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो!

Manasvi Choudhary

त्वचेच्या समस्या

आजकाल वाढते प्रदूषण, धूळ, ताण- तणाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

Skin care | Saam Tv

चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक

त्वचा निस्तेज, डल दिसते यासाठी अनेक लोक पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते.

Natural Skin Glow Tips

घरीच करा फेशियल

तुम्हालाही पार्लरसारखी चमक चेहऱ्यावर पाहिजे असेल तर तुम्ही घरच्या घरी काही स्टेप्स फॉलो करा.

How To Do Facial At Home

चेहरा स्वच्छ धुवा

सर्वातआधी चेहरा स्वच्छ धुवा. फेशियलची सुरूवात करण्यापूर्वी चेहऱ्यावरील धूळ, तेल आणि मेकअप काढणे महत्वाचे आहे.

Face Wash Tips

स्क्रब करा

मृत त्वचा काढण्यासाठी नियमितपणे स्क्रब करणे महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही घरच्या घरी स्क्रब, मध आणि लिंबाचा रस मिक्स करा आणि चेहऱ्यावर हलकेसे मसाज करा.

Scrubbing

कोरफड जेल लावा

स्क्रबिंग केल्यानंतर चेहऱ्यावर कोरफडीचा जेल लावा यामुळे त्वचेतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

Aloe vera Gel | GOOGLE

चेहऱ्याला वाफ द्या

एका पातेल्यात पाणी उकळून घ्या नंतर चेहऱ्यावर वाफ द्या. डोके टॉवेलने झाका आणि चेहऱ्यावर वाफ घ्या यामुळे त्वचेची छिद्रे उघडतात त्वचा खोलवर स्वच्छ होते.

Steam Water | GOOGLE

फेसपॅक लावा

चेहऱ्यावर मुलतानी माती, चंदन आणि गुलाब जल याचे एकत्र फेस पॅक तयार करा. हा पॅक चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे लावून ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.

Chandan Face Pack

या टिप्स करा फॉलो

फेशियल झाल्यानंतर चेहऱ्यावर टोनर, सीरम आणि मॉइश्चरायझर नक्की लावा यामुळे त्वचेचे पोषण होते.

How To Do Facial At Home

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी 'भेंडी जेल' ठरेल फायदेशीर; अशा पद्धतीने करा वापर

Skin Care Tips
येथे क्लिक करा...