चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी 'भेंडी जेल' ठरेल फायदेशीर; अशा पद्धतीने करा वापर

Manasvi Choudhary

चेहऱ्याच्या समस्या

वाढते प्रदूषण, धूळ, ताणतणाव आणि चुकीची जीवनशैली यामुळे आजकाल कमी वयातच चेहऱ्यावर परिणाम दिसतात.

Skin Problem

त्वचेसाठी घरगुती उपाय

त्वचेवर सुरकुत्या येणे, बारीक रेषा दिसणे, त्वचा निस्तेज दिसणे या त्वचेच्या समस्या कमी वयातच सुरू होतात. यासाठी तुम्ही महागड्या क्रिम्स लावण्यापेक्षा घरगुती सोपे उपाय करू शकता.

Skin Care Tips

भेंडीचे त्वचेसाठी फायदे काय?

भेंडी त्वचेसाठी फायदेशीर मानली जातात. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी तसेच त्वचेवर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी भेंडी जेलचा वापर तुम्ही करू शकता.

Okra | yandex

साहित्य

भेंडी जेल बनवण्यासाठी भेंडी, कोरफड, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई हे साहित्य घ्या.

Okra | yandex

भेंडी स्वच्छ धुवा

सर्वातआधी भेंडी स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर तीचे बारीक बारीक तुकडे करा. गॅसवर एका पातेल्यामध्ये पाण्यात भेंडी उकळवून घ्या.

Okra Gel for Skin

मिश्रण उकळवून घ्या

साधारण १० ते १५ मिनिटांनी पाणी उकळ्यानंतर घट्ट होईल. मिश्रण जेलसारखे घट्ट झाल्यानंतर थंड करायला ठेवा.

Okra Benefits

मिश्रणात या गोष्टी मिक्स करा

यानंतर गुळगुळीत जेल गाळणीने गाळून घ्या. त्यात कोरफड गर, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई मिक्स करा.

Okra Benefits

कधी लावावे?

रात्री झोपण्यापूर्वी हे जेल तुम्ही चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा.

Okra Benefits

भेंडी जेलचा त्वचेसाठी असा होतो फायदा

भेंडी जेल चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील निस्तेजपणा कमी करण्यास मदत होते. त्वचा नैसर्गिकरित्या चमकते सुरकुत्या देखील कमी होतात. त्वचा मऊ आणि फ्रेश दिसते.

Okra Benefits

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: वटपौर्णिमेनिमित्त साडीवर खुलून दिसतील 'या' 5 लेटेस्ट नथ डिझाइन्स

येथे क्लिक करा..