Maharashtra News Live Update: ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

Marathi Breaking Live Headlines Updates : मुंबई, पुण्यासह राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news
Published On

४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी

भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी ४ व ५ जुलै रोजी रेड अलर्ट जारी करून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून संबंधित आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्याला दोन दिवस रेड अलर्ट

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पालघर जिल्ह्याला दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे

याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांना जिल्हाधिकारी कार्यालयातून शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

शनिवार ४ जुलै आणि रविवार ५ जुलै रोजी पालघर जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काही ठिकाणी अतिमुसळधार, तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे

रत्नागिरी - खेड शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरलं जगबुडी नदीच्या पुराचं पाणी

रत्नागिरी - खेड शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरलं जगबुडी नदीच्या पुराचं पाणी

जगबुडी नदीने ओलांडलीय इशारा पातळी

खेड नगर परिषद प्रशासन आणि तालुका आपत्ती विभागाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना

जनजीवन विस्कळीत

पोलादपुर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस वाहतुकीसाठीसाठी बंद

पोलादपुर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस वाहतुकीसाठीसाठी बंद

० रायगड मध्ये कोसळणाऱ्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी घेतला निर्णय

० आज पासून पुढे 6 जुलै पर्यंत आंबेनळी घाटातुन होणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार

सांगली शिराळा तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

सांगलीच्या शिराळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठयात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.गेल्या 24 तासात शिराळा तालुक्यामध्ये 24 मिलिमीटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासात 46 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे चांदोली धरणात पाण्याची आवक वाढल्याने धनाच्या पाणी पातळी देखील वाढ झाली असून 11.98 टीएमसी इतका पाणीसाठा धरणा मध्ये निर्माण झाला आहे.

रायगडच्या दरी-डोंगरांत धबधबे प्रवाहीत; पर्यटनाला सुरुवात

पावसाळ्याच्या आगमनानंतर रायगड जिल्ह्यातील दरी-डोंगरांमध्ये धबधबे प्रवाहीत होऊ लागले आहेत. हिरवाईने नटलेल्या परिसरातून फेसाळत कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत असून पावसाळी पर्यटनाला वेग आला आहे. महाड तालुक्यातील केंबुर्ली धबधबा सध्या पर्यटकांची विशेष पसंती ठरत आहे. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देत असून आगामी काळात रायगडमधील पर्यटनाला आणखी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाईंदरमध्ये झाड कोसळून तरुणाचा मृत्यू; दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी

भाईंदरच्या राई गावात धावत्या दुचाकीवर नारळाचे झाड कोसळून गंभीर जखमी झालेल्या राहुल अशोक पाटील (वय ३५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित ठेकेदार, देखभाल संस्था किंवा जबाबदार व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६ अंतर्गत गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे मिरा-भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही मनसेने दिला आहे.

सिया गोवेल आणि चेतन चौधरीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी आज न्यायालयासमोर तीन दिवसाची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र फिर्यादी पक्षाकडे आज कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने नाल्याने सियागोवेल आणि चेतन चौधरी ची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, पण परसेंटेज कमी असायला पाहिजे - सदाशिव पाटील 

भ्रष्टाचार आणि चोरी काही प्रमाणात झाली पाहिजे, पण परसेंटेज कमी असायला पाहिजे, असं खळबळजनक वक्तव्य अंबरनाथ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केलं. अंबरनाथ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत डायसवर बसून पाटील यांनी हे वक्तव्य केलं. यामुळे आता सदाशिव पाटील अडचणीत येण्याची चिन्हं आहेत.

सिया गोयल आणि चेतन चौधरी ला पोलिसांनी न्यायालयात केलं हजर 

बहुचर्चित केतन अग्रवाल खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना आज लोणावळा पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात हजर केल आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांची पोलिस कोठडी आज संपत असल्याने आज लोणावळा पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल आहे. आता न्यायालय सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना पुन्हा पोलिस कोठडी सुनावणार का ? न्यायालय कोठडीत रवानगी करणार या कडे सर्वाच लक्ष लागून आहे.

पुण्यात गादी कारखान्याला आग

पुण्यात गादी कारखान्याला आग

दोन दुकानातील साहित्य जळून खाक

आज दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास मांजरी हडपसर मधील घटना..

वेल्डिंगचे काम सुरू असताना उडालेल्या ठिणग्यांतून लागलेल्या आगीत हडपसर मांजरी रस्त्यावरील रंगीचा ओढा परिसरात दोन दुकाने जळून भस्मसात झाली.

गोसीखुर्द धरणाचे ३ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले

भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणात असलेला राखीव साठा खाली करण्यात आला.

वाई महाबळेश्वर मार्गातील पसरणी घाटामध्ये दरड कोसळली

महाबळेश्वर–वाई मार्गावरील पसरणी घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मार्गावर वाहतूक धोकादायक झाली असून वाहनचालकांनी अत्यंत सावधगिरीने प्रवास करावा. प्रशासनाकडून दरड हटविण्याचे काम सुरू असून नागरिकांनी शक्य असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा.

भाजप नगर सेवकाने टाकला चक्क नगर परिषदेत कचरा

वाशिम शहरातील प्रत्येक प्रभागात कचरा गाड्या वेळेवर जात नसल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत असून याकडे नगर परिषद प्रशासन दुर्लक्ष करत नागरिकांच्या आरोग्यवर परिणाम होत असल्याचा आरोप करत प्रभाग क्रमांक आठ चे नगर सेवक सतीश वानखेडे यांनी चक्क कचरा भरून नगर पालिकेत अधिकाऱ्यांच्या दालनात आणून टाकल्याने नगर पालिकेत सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात सर्वदूर पाऊस- IMD

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पाऊस चांगल्या प्रकारे पडत आहे

घाटमाथ्यावर आणि कोकण किनारपट्टीवर पावसाची परिस्थिती सध्या चांगली आहे,राज्यात इतर भागात पाऊसाची तीव्रता कमी

राज्यात सर्व दूर पाऊस आहे मात्र हलका आणि मध्यम स्वरूपाचा आहे

येणारे दोन ते तीन दिवस मुंबईत पावसाची स्थिती आहे तशी राहणार

मान्सूनचे वारे सक्रिय झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टी मुंबई मध्ये दोन ते तीन दिवस पावसा राहणार

भिवंडी सर्व ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम

शहरातील तीन बत्ती भाजी मार्केट परिसरामध्ये गुडघाभर साचले पाणी

छोट्या मोठ्या दुकानात शिरले पाणी

पावसाचा जोर जर कायम राहिल्यास अनेक भागांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

सकल भाग असल्यामुळे कमरे भर साचले पाणी

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई

औंढा नागनाथ देवस्थान परिसरात निकृष्ट पेढे विक्रेत्यांवर FDA ची कारवाई, 1 क्विंटल पेढे केले नष्ट

छत्रपती संभाजीनगरात मुदतबाह्य दूध वापरणाऱ्या तीन ज्यूस सेंटरचा परवाना निलंबित

बीडमध्ये केक-बर्फी कारखान्यावर छापा; 35 हजार 536 चा संशयित अन्नसाठा नष्ट

सोलापूर महानगरपालिकेच्या विषय समित्यांवर भाजपकडून नवख्या नगरसेवकांना संधी

सात समित्यांच्या निवडी बिनविरोध, महापौर विनायक कोंड्याल यांनी अधिकृत केली घोषणा

महिला आणि बाल विकास समिती साठी निर्मला जंगम यांची वर्णी

नगरसेवक विजय चिप्पा, सत्यजित वाघमोडे, सुनील खटके, स्वाती बडगु, राजशेखर पाटील, श्रद्धा पवार यांची विविध समिती सभापतीपदी एक मताने झाली निवड

महापौर आणि गटनेत्यांकडून नवीन सभापतींचा सत्कार करण्यात आला..

मिरा-भाईंदरमध्ये नारळाचे झाड कोसळल्याने एकाचा मृत्यू

मिरा-भाईंदरमधील राई गावात धावत्या दुचाकीवर नारळाचे झाड कोसळल्याने झालेल्या अपघातात, गंभीर जखमी राहुल अशोक पाटील(वय 35) या दुचाकीस्वाराचा आज उपचारादरम्यान रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला.

दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसात रस्त्यावरून जात असताना अचानक हा भीषण अपघात घडला होता.

नाशिक- मनमाड परिसरात पावसाला सुरुवात

नाशिकच्या मनमाड व परिसरात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज सकाळपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे,कधी रिमझिम तर कधी माध्यमस्वरूपाच्या जोरदार सरी पडत असल्याने बळीराजा सुखावला असून,ज्या शेतकऱ्यांनी अगोदर मक्याची पेरणी केली होती त्या पिकांना जीवदान मिळालंय.

मुंबई गोवा महामार्गावर अंजनारी घाटात कंटेनर अपघात

लांजा तालुक्यातील अंजनारी घाटाच्या तीव्र उतारावर मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या बाजूला हा कंटेनर कलंडला. अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे महामार्गाची एक लेन पूर्ण बंद आहे. लांजा पोलीस प्रशासन घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करुन अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले.

हिंगोलीत पूल नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गांगलवाडी गावाच्या जवळ नदीवर पूल नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांचा शाळेत येण्यासाठी धोकादायक प्रवास सुरू आहे,नंदगाव,गांगलवाडी जांभळी, तांडा,जांभरून, दूरचुना, वडचुना, भोसी सिद्धेश्वर परिसरातील शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी दररोज हा धोकादायक प्रवास पार करत नदीच्या पात्रातून शाळेत दाखल होतात

कल्याणमध्ये महायुतीत राडा, शिंदेसेना आणि भाजप समर्थकांकडून परस्परविरोधी गुन्हे

कल्याण पूर्वेत महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजप समर्थकांमध्ये झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप करत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत असून नेमकी घटना कशामुळे घडली, याचा शोध घेत आहेत.

सिंधुदुर्गात करूळ घाटात दरड कोसळून महामार्ग ठप्प

करूळ घाटात दरड कोसळून महामार्ग ठप्प झाला आहे. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली आहे.घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग विभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही दरड कोसळल्यामुळे सिंधुदुर्ग व कोल्हापूर कडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज आजरा भागात मुसळधार पाऊस

गडहिंग्लज – नेसरी वाहतूक बंद

भडगाव जवळ पर्यायी पुलाचा काही भाग खचला

वाहतूक आजरा मार्गे सुरू

पंढरपूरमध्ये जुन्या कायद्यानुसार भूसंपादन करण्याची मागणी

सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी 2013 च्या जून्या कायद्यानुसार भूसंपादन करावे या मागणीसाठी आज मनसेचे नेते प्रशांत गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

समुद्रपूर तालुक्यातील रासा-घोंसा येथे अस्वल व पिलाचे दर्शन

समुद्रपूर तालुक्यातील रासा-घोंसा येथे अस्वल व पिलाचे दर्शन

- समुद्रपूर तालुक्यातील रासा-घोंसा गावात गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका अस्वलासह त्याचे पिल्लू शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

- अस्वल व पिल्लाने एका घराच्या बाहेरील आवारात काही काळ ठिय्या दिला.

जुन्नरमध्ये सापांचा वाढला वावर; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

जुन्नर तालुक्यात पावसाळ्यात सापांची बिळे पाण्याने भरल्याने साप मानवी वस्तीकडे येण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे साप दिसल्यास घाबरू नये किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू संस्थेने केले आहे.

संत सोपानकाका पालखीचा जुनामार्ग प्रशासनाने केला खुला

पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील नीरा येथून बारामती तालुक्यातील निंबुतकडे जाणारा संत सोपान काकांचा जुना पालखीमार्ग गेल्या अनेक वर्षापासून बंद होता.

हा पालखी सोहळा नीरा शहरातून जात असल्याने या मार्गाकडे दुर्लक्ष केलं जात होतं

मात्र पालखी सोहळ्यातील वाढतील गर्दी पाहता, सामाजिक कार्यकर्त्यांच्या व पुरंदर महसूल विभागाच्या पुढाकारातून हा मार्ग आता खुला करण्यात आलाय

शिंगणापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त

गेले तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे परिणामी जिल्ह्यातल्या सर्वच नद्यांच्या पाणी पातळी मध्ये मोठी वाढ झालेली आहे. आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्यातले पाच बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. त्यापैकी प्रमुख बंधारा असणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्यावर आज सकाळी पाणी आल्याने हा बंधारा पाण्याखाली गेला. मात्र या बंधाऱ्यावरून पाण्यातून वाट काढत अनेक नागरिक धोकादाय स्थितीत प्रवास करत होते. त्या पार्श्वभूमीवर या बंधाऱ्यावरची वाहतूक पोलीस प्रशासनाने बंद केलेली आहे.

ठाणे बेलापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

ठाणे बेलापूर रस्त्यांवर केमिकल कंटेनर बंद पडून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस दैनात करण्यात आले आहेत

दोन तासापासून वाहतूक कोंडी

Pune : वरंधा घाटातील शिरगाव हद्दीत दरड कोसळली,रस्ता बंद

वरंधा घाटातील शिरगाव हद्दीत दरड कोसळली,रस्ता बंद

दरड हटवण्यासाठी प्रशासनाच्या हलचाली

Pune Sinhagad : सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळली

सिंहगड किल्ल्यावर दरड कोसळली

किल्ले सिंहगडावर पायरी मार्गावर दरड कोसळली

घटनेत जीवितहानी नाही मात्र पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे

किल्ले सिहगड वरील पहिल्या दरवाज्याजवळ घडली घटना

कर्जमुक्ती योजनेसाठी तीन लाख शेतकऱ्यांची माहिती सादर

कर्जमुक्ती योजनेसाठी तीन लाख शेतकऱ्यांची माहिती सादर

नियमित कर्ज भरणाऱ्या 93 हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Solapur : सामाजिक वनीकरण विभागातील कथित घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे

सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागातील कथित 109 कोटी रूपयांच्या वृक्ष लागवड घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.

या संदर्भात कोल्हापूर खंड पीठाने तसे आदेश दिले आहेत,अशी माहिती याचिकाकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

न्यायालयाच्या या आदेशामुळे सामाजिक वनीकरण विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

चेन्नईच्या भाविकाकडून शिर्डीच्या साईबाबांना सुवर्ण शंख दान

शिर्डीच्या साईबाबांना चेन्नई येथील साईभक्त श्रीमती जी. लक्ष्मीकांता यांनी 100 ग्रॅम वजनाचा सुंदर सुवर्ण नक्षीकाम केलेला शंख अर्पण केला आहे.. या सुवर्ण शंखाची किंमत 13 लाख 27 हजार रुपये इतकी असून शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते दानशूर साईभक्त श्रीमती जी. लक्ष्मी कांता यांचा विशेष सत्कार करण्यात आला..

केंद्रीय जल आयोगाकडून नद्यांच्या पाणी पातळीची मोजणी सुरू

रायगडमध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातलीत झपाट्याने मोठी वाढ होताना दिसत आहे. धोकादायक परिस्थिती नसली तरी नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. केंद्रीय जल आयोगाकडून प्रमुख नद्यांची पाणी पातळी, प्रवाह यांची मापणी केली जात आहे. काउंटर आणि कर मशीनच्या सहाय्याने सध्या नद्यांची पाणी पातळी आणि पाण्याचा प्रवाह मोजला जात आहे.

टांगलेल्या चपला अंधश्रद्धा नव्हे शेतकऱ्यांच्या वेदनेचा मूक आक्रोश, तरुण कलाकाराच्या इन्स्टॉलेशन आर्टची सर्वत्र चर्चा

कला ही केवळ सौंदर्याची अभिव्यक्ती नसून समाजातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करणारे प्रभावी माध्यमही ठरू शकते. पुण्यातील हिंगणे खुर्द परिसरात झाडाला टांगलेल्या जुन्या चपला, दोर आणि लाल रंगाचे शिंतोडे पाहून अनेकांनी सुरुवातीला हा प्रकार अंधश्रद्धा, करणी किंवा भानामतीशी संबंधित असल्याचा समज करून घेतला. मात्र, प्रत्यक्षात ही शेतकरी आत्महत्यांच्या वेदनेवर भाष्य करणारी एक प्रभावी इन्स्टॉलेशन आर्ट असल्याने बळी अस्तित्वाच्या खुणा' या परफॉर्मेटिव्ह इन्स्टॉलेशनद्वारे तरुण कलाकार सुशील बनसोडे याने बळीराजाच्या मूक आक्रोशाला कलात्मक अभिव्यक्ती दिली आहे.

नेपाळ मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील भाविकांचा मानसरोवर यात्रेला जाण्याचा मार्ग मोकळा

नेपाळ मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील ३०० नागरिकांचा मानसरोवर यात्रेला जाण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. चिनी दूतावास यांच्याकडून परमिट म्हणजेच परवाना मिळाल्यानंतर आज दुपारपर्यंत हे सर्व भाविक चिनी सीमा ओलांडणार आहेत. ४ दिवसांपूर्वी नेपाळ मध्ये महाराष्ट्राचे भाविक अडकले असल्याची बातमी सर्वात प्रथम "साम टिव्ही" ने दाखवली होती. या बातमीची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतल्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला होता. परराष्ट्र मंत्रालयाकडून चिनी दूतावासाशी संवाद साधल्यानंतर आता भाविकांचा पवित्र असलेल्या मानसरोवर यात्रेचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत भाविकांनी साम टिव्ही चे सुद्धा आभार मानले आहेत..

लोणावळ्यात पावसाची दमदार हजेरी

पर्यटन नगरीत पावसाची दमदार बॅटिंग सुरू होताच लोणावळ्याचा निसर्ग पुन्हा एकदा बहरून आलाय. डोंगररांगा धुक्याच्या दुलईत हरवल्या आहेत, तर कडेकपाऱ्यांतून शुभ्र धबधबे फेसाळत कोसळू लागले आहेत. या नयनरम्य दृश्यांनी पर्यटकांना भुरळ घातली असली, तरी या सौंदर्याला धोक्याचीही किनार आहे. सहारा ब्रिज परिसरातील धबधब्यावर अनेक पर्यटक जीवाची पर्वा न करता उंच डोंगरावर चढून सेल्फी आणि रील्सच्या मोहात धोकादायक पर्यटन करताना दिसत आहेत. सततच्या पावसामुळे डोंगरावरील वाटा निसरड्या झाल्या असून, कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोणावळा नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही पर्यटकांकडून सूचनांकडे दुर्लक्ष होत आहे

लातूर उदगीर महामार्गावर कार व ऑटोचा अपघात

लातूर उदगीर महामार्गावर अजणसोंडा पाटीजवळ कार, ऑटो व मोटरसायकलचा तिहेरी अपघात होऊन तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

उदगीरहून लातूरकडे जाणारी कार ,ऑटो आणि बाईक यांचा तिहेरी अपघात झाला आहे. यामध्ये प्रद्यूम्न माचवे (वय ३५) रा. नळेगाव , कावेरी माचवे (वय ३०) रा. नळेगाव , गोपाळ माने (वय ३५) रा. उदगीर हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.

मराठवाड्यात मान्सूनची वाटचाल अत्यंत संथ गतीनं

मराठवाड्यात मान्सूनची वाटचाल अत्यंत संथ गतीनं सुरू असल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. २ जुलैपर्यंत विभागात जून ते सप्टेंबर या वार्षिक हंगामातील सरासरीच्या केवळ १८.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. विभागात आतापर्यंत १२७.६ मि.मी पावसाची नोंद झाली. ६७९ मि.मी. विभागाची वार्षिक सरासरी असून सरासरीच्या ८७.४ टक्के ते प्रमाण आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आजवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२० मि.मी., जालना जिल्ह्यात १३४, बीड १२२, लातूर १०५, धाराशिव १३०, नांदेड, १४५, परभणी ११४, हिंगोली १५२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २ जुलैच्या अहवालानुसार एका दिवसात ६.४ मि.मी. पावसाची नोंद विभागात झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत मराठवाड्यात १४३ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत ११८.७ मि.मी. पाऊसझाल्याने मागील वर्षाच्या तुलनेतही पावसाचे प्रमाण कमी आहे. पेरण्यांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतुकीस अडथळा

मुंबई गोवा महामार्गावर माणगावमध्ये पावसाचे पाणी रस्त्यावर साचले आहे. पहिल्या पावसा पासून आजही हि परिस्थिती कायम आहे. रस्त्यावर साचलेल्या या पाण्यामधुन मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकी, रिक्षा आणि मोठी अवजड वाहन एकच वेळी या ठिकाणी आल्यानंतर वादाचा आणि अपघाताचा धोका संभवतो आहे. सातत्याने महामार्गावर साचत असलेल्या या पाण्याकडे आणि येथे निर्माण होणाऱ्या परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

Maharashtra News Live Update: उल्हासनगरात मुसळधार पावसाचा फटका!

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. रेल्वे स्टेशनजवळील मद्रासी पाडा येथे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या नाल्या शेजारी असलेल्या एका दुकानाची भिंत मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक साक्षी सुर्वे यांनी तात्काळ अग्निशमन दल आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समितीला कळवले.यानंतर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त आणि उल्हासनगरच्या महापौर अश्विनी निकम यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. धोकादायक बांधकाम तातडीने हटवण्यासाठी महानगरपालिकेची जेसीबी मागवून तोडकामाचे आदेश देण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, शहरातील नाल्यांवर उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे येत्या आठ दिवसांत हटविण्यात येतील, अशी ग्वाही महापौर अश्विनी निकम यांनी यावेळी दिली.

यवतमाळ जिल्ह्यात 47 मंडळात अतिवृष्टी

हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्यात चार जुलैपर्यंत येलो अलर्ट जाहीर केलाय या काळात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता हा अंदाज खरा ठरलाय गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली यात 47 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली कमी वेळात बरसलेल्या या पावसाने मात्र शेतशिवाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

राज्याच्या अनेक भागांत मान्सूनने दमदार हजेरी लावली

सध्या सह्याद्रीच्या डोंगररांगामध्ये रिमझिम पाऊस सुरू असला, तरी धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होण्यासाठी आवश्यक असलेल्या मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कुकडी प्रकल्पातील सात आणि भीमा-भामा खोऱ्यातील तीन अशा एकूण नऊ जलाशयांतील पाणीसाठा अत्यंत खालावला असून, जुलै महिना सुरू असतानाही ही धरणे जवळपास कोरडी आहेत. दरवर्षी याच कालावधीत ३० ते ३५ टक्के भरलेली असणारी धरणे यंदा रिकामी असल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. या धरणांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये खरीप हंगाम, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला तरच धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊन शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com