Heart Health: या ५ चुकांमुळे वाढतोय हार्ट फेल होण्याचा धोका

Surabhi Jayashree Jagdish

हृदय आरोग्यासाठी आहार

योग्य आहार आणि नियमित शारीरिक हालचाल हृदय निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. संतुलित आहारामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं

Healthy Heart | saam tv

हृदयावर परिणाम करणारे घटक

हृदयाचे आरोग्य फक्त आहार आणि व्यायामावर अवलंबून नसतं तर इतर अनेक घटकही त्यावर परिणाम करतात. झोप, तणाव, प्रदूषण आणि दैनंदिन सवयी यांचा थेट संबंध हृदयाशी असतो. त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे.

Cardiovascular Health | saam tv

झोपेची कमतरता

दररोज फक्त 6 तास झोप घेणं हृदयासाठी धोकादायक ठरू शकतं. सतत झोप कमी झाल्यास हार्ट फेल्युअर आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. शरीराला दुरुस्ती आणि विश्रांतीसाठी पुरेशी झोप आवश्यक असतं अन्यथा हृदयावर अतिरिक्त ताण येतो.

Heart Disease Prevention | saam tv

प्रदूषित हवेत श्वास घेणं

वाहतुकीतील धूर आणि धुळीमुळे प्रदूषित हवा दीर्घकाळ श्वासात गेल्यास हृदयाच्या धमन्यांना नुकसान होतं. सूक्ष्म कणांमुळे धमन्यांमध्ये प्लाक जमा होऊन हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळे स्वच्छ हवेत राहण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे.

Healthy Lifestyle | saam tv

सततचा तणाव

सतत तणावाखाली राहिल्यास शरीरात कॉर्टिसोल हार्मोन वाढतो आणि रक्तदाब वाढतो. यामुळे हृदयावर अतिरिक्त दाब निर्माण होतो आणि हृदयाचे कार्य बिघडू शकतं. दीर्घकाळ तणाव राहिल्यास गंभीर हार्टच्या समस्यांचा धोका वाढतो.

Sleep and Heart Health | saam tv

तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं

दात आणि हिरड्यांची योग्य काळजी न घेतल्यास बॅक्टेरिया रक्तात जाऊन सूज निर्माण करतात. ही सूज हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम करते आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळे नियमित दात घासणं आवश्यक आहे.

Stress Management | saam tv

चुकीच्या आहाराच्या सवयी

आतड्यांतील बॅक्टेरिया हृदयाच्या आरोग्यावर थेट परिणाम करतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतात. चुकीचा आहार घेतल्यास आतड्यांचं संतुलन बिघडतं. दही, ताक आणि फायबरयुक्त आहार घेतल्याने आतड्यांचं आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं.

Cholesterol Control | saam tv

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

Heart Health | saam tv
येथे क्लिक करा