Maharashtra Politics News:  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीच्या नाराजीनाट्यात मोठा ट्वीस्ट! सुनील तटकरेंना केंद्रात लॉटरी; श्रीरंग बारणेंनाही संधी

Maharashtra Politics News: राष्ट्रवादीच्या नाराजीनाट्यात नवा ट्वीस्ट आला असून अजित पवार यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Pramod Subhash Jagtap

दिल्ली, ता. २७ सप्टेंबर

Sunil Tatkare In Parliament Standing Committees: राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यापासून महायुतीमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर शिंदेसेना तसेच भाजपचे नेते वारंवार टीका करत आहेत. त्यामुळे अजित पवार गट नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच अजित पवार महायुतीमधून बाहेर पडतील, अशाही बातम्या समोर आल्या होत्या. अशातच आता राष्ट्रवादीच्या नाराजीनाट्यात नवा ट्वीस्ट आला असून अजित पवार यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील 2024-25 या वर्षासाठी 24 विभागीय संसदीय स्थायी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहातील सदस्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्रातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनाही संधी देण्यात आली आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे ऊर्जा समिती प्रमुख पदाची जबाबदारी तर खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस समितीच्या चेअरमनपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये मिळालेल्या या महत्वाच्या जबाबदारीमुळे सुनील तटकरे यांचे केंद्रातील राजकीय वजन चांगलेच वाढणार आहे. तसेच या नियुक्तीमधून महायुतीमध्ये कुठेही नाराजी नसून अजित पवार यांना सोबत घेऊनच वाटचाल करण्याचा संदेश दिल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान, मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील 2024-25 या वर्षासाठी 24 विभागीय संसदीय स्थायी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक ११ समित्यांचे अध्यक्षपद हे भारतीय जनता पक्षाकडे आहे. तर काँग्रेसकडे चार समित्यांचे सदस्यपद आहे. काँग्रेसने केंद्र सरकारकडे 6 स्थायी समित्यांचे अध्यक्षपद मागितले होते, मात्र त्यांना चार समित्यांच अध्यक्षपद देण्यात आले आहे. काँग्रेसकडे परराष्ट्र, शिक्षण, कृषी आणि ग्रामीण व्यवहार या समित्यांच्या प्रमुख पदाची जबाबदारी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: टीम इंडियाला दुखापतींचं ग्रहण, विराट गेला होता हॉस्पिटलमध्ये, सरावावेळी २ फलंदाज जायबंदी

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT