NCP MLA Sanjay Khodke Accident saam Tv
महाराष्ट्र

Accident: अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला कारने उडवलं, अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

NCP MLA Sanjay Khodke Accident: अमरावतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांचा अपघात झाला. दुचाकीवरून जाणाऱ्या संजय खोडके यांना कारने धडक दिली. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झालेत.

Priya More

Summary -

  • अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमादाराचा अपघात

  • आमदार संजय खोडके यांच्या दुचाकीला कारची धडक

  • भीषण अपघातामध्ये आमदार गंभीर जखमी

  • आमदारावर रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

अमरावतीमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार संजय खोडके यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. या अपघातामध्ये आमदार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या आमदार संजय खोडके यांना उपचरासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीमध्ये विधानपरिषदेचे आमदार संजय खोडके हे अपघातामध्ये गंभीर जखमी झाले. महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने आज अमरावती शहरात कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार खोडके दुचाकीवरून जात होते. याचवेळी त्यांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की आमदार खोडके दूरवर फेकले गेले आणि ते रस्त्यावर पडले.

हा भयंकर अपघात रस्त्याच्या कडेला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. हा अपघाताचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून या व्हिडीओतून अपघाताची भीषणता दिसून येत आहे. अपेघातामध्ये आमदार खोडके यांच्या पायाला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT