कळमनुरीत भाजपचा आमदार वाढेल; प्रज्ञा सातव यांच्या पक्ष प्रवेशानंतर मुटकुळेंचा दावा, शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं

tanaji mutkule News : कळमनुरीत आता भाजपचा आमदार होईल, असा दावा भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी केला. मुटकुळे यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
tanaji mutkule on pradnya satav
tanaji mutkule NewsSaam tv
Published On
Summary

प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलाय.

सातव यांच्या पक्षप्रवेशानंतर भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण

या घडामोडींमुळे महायुतीत आणि शिंदे सेनेत अस्वस्थता

विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या घटनेला 24 तासांचा कालावधी उलटला नसताना आता प्रज्ञा सातवांच्या पक्षप्रवेश सोहळ्याचे प्रमुख कारण पुढे आले आहे.

tanaji mutkule on pradnya satav
Fact Check : नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा राजीनामा? सोशल मीडियावर अफवांचा पाऊस, पडद्यामागील सत्य आलं समोर

भाजपने महाराष्ट्रातील सर्वच विधानसभा मतदारसंघात ताकद आणि सक्षम उमेदवार उभे करायला सुरुवात केली आहे. याला मराठवाड्यातील भाजपचे नेते आणि हिंगोली विधानसभेचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सातव यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर केलेलं वक्तव्य कारण ठरलं आहे.

प्रज्ञा सातव यांचा काल झालेला पक्षप्रवेश सोहळा हा आमच्यासाठी सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे. आता कळमनुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार वाढणार असल्याचे थेट मुटकुळे म्हणाले आहेत. भाजप आमदाराच्या या दाव्याने आता महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे.

tanaji mutkule on pradnya satav
ड्रोनने रेकी, महामार्गावर प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा खेळ खल्लास; पोलिसांकडून सिनेस्टाईल अटक

एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांची वरिष्ठ पातळीवरती कोंडी करणे सुरू असताना आता स्थानिक पातळीवर देखील भाजपाने शिंदेंच्या आमदारांसमोर सक्षम पर्याय उभे करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याचं या निमित्ताने पुढे आले आहे. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या वक्तव्यानंतर शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

Q

प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा का दिला?

A

प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलं होतं. त्यामुळे त्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला.

Q

प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामागचं कारण काय?

A

भाजप कळमनुरी विधानसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार उभा करण्याच्या तयारीत असल्याचं कारण मुटकुळेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेत आलं आहे.

Q

तानाजी मुटकुळे यांनी नेमकं काय म्हटलं?

A

कळमनुरी मतदारसंघात लवकरच भाजपचा आमदार वाढेल, असं मुटकुळेंनी सूचक वक्तव्य केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com