

वाहनधारकांना अडवून लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळळ्या
पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल पद्धतीने केली अटक
पोलिसांनी संपूर्ण गावाला घेरा घालून चोरट्यांना केली अटक
योगेश काशिद, साम टीव्ही
बीड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना अडवून लुटणाऱ्या टोळीला बीड पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली आहे. बीड आणि धाराशिव पोलिसांनी संयुक्तिक कारवाई केली. त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी गावात ड्रोनच्या माध्यमातून गुन्हेगारी वस्तीवर छापा टाकला. ड्रोन कॅमेरा द्वारे रेकी करून शंभर पोलिसांनी गावाला चारही बाजूने घेरा टाकत चोरट्यांना अटक केलीये.
धाराशिव जिल्ह्यातील खामकरवाडी गावात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे चोरटे आश्रय घेत होते.त्यामुळे तेथे जाण्यास पोलीस देखील धजावत नसत मात्र बीड आणि धाराशिव पोलिसांनी अगदी सिनेस्टाईल पद्धतीने टोळी सदस्यांना अटक केली.मागील काही दिवसात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांना अडवून धारदार शस्त्राचा धाक दाखवत लूटमार केली जात होती.त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांमध्ये दहशत होती.
अखेर या टोळीतील सदस्यांना अटक करत अकरा तोळ्यांच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा 14 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या टोळीतील तिन सदस्य पोलिसांच्या ताब्यात असून आणखी तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्या वकिलावर गुन्हा दाखल झाला आहे. बंडू आंदेकर याच्या घरी छापेमारी करताना पोलिसांशी घातली हुज्जत होती. मिथुन चव्हाण आणि प्रशांत पवार अशा गुन्हा दाखल झालेल्या दोन्ही वकिलांची नावे आहेत. २ दिवसांपूर्वी बंडू आंदेकर याच्या घरी पुणे पोलिसांनी छापेमारी केली होती.
हाऊस सर्च परमिशन आहे का? असा जाब या वकिलांनी पुणे पोलिसांना विचारला होता. त्यानंतर सरकारी कामांमध्ये अडथळा आणल्या प्रकरणी दोन्ही वकिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.