Prakash Solanke expresses frustration over ministerial bias, extends wishes to Dhananjay Munde while calling out party leadership Saam Tv
महाराष्ट्र

Prakash Solanke: मुंडेंच्या वापसीवर राष्ट्रवादीत नाराजी? कॅबिनेट मंत्रिपदावरून प्रकाश सोळंकेंचा पक्षश्रेष्ठींवर निशाणा

Prakash Solanke Comment On Cabinet Ministry : आपण ४५ वर्षाचा इतिहास पाहिला तर मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही. बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव दिला आहे का? असा सवाल प्रकाश सोळंके यांनी केलाय.

Bharat Jadhav

  • प्रकाश सोळंके यांनी ओबीसी नसल्यामुळे मंत्रीपद न मिळाल्याची खंत व्यक्त केली.

  • धनंजय मुंडेंच्या संभाव्य मंत्रिमंडळ पुनरागमनावर त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.

  • सोळंके यांनी पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधत जातीय अन्यायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

  • त्यांनी मुंडेंना शुभेच्छा दिल्या आणि बीडच्या पालकमंत्रीपदासाठी समर्थन दर्शवलं.

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या वापसीनंतर राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटू लागलाय. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळात पुनवर्सन केलं जाणार असल्याची चर्चा सुरू झालीय. अजित पवार यांनी खुद्द त्याबाबत विधान केलंय. परंतु धनंजय मुंडे यांच्या वापसीची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटू लागलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षश्रेष्ठींवर उघड नाराजी व्यक्त केलीय.

बीड जिल्ह्यात 45 वर्षात मराठा समाजाचा कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री झाला नाही. बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव दिला आहे का? सवाल करत प्रकाश सोळंके यांनी आपली नाराजी बोलून दाखवलीय. माझी जात आडवी येते. मी ओबीसीमध्ये जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती. असं प्रकाश सोळके म्हणालेत. त्याचबरोबर त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. धनंजय मुंडेंना बीडचे पालकमंत्री करा किंवा राज्य पातळीवरील मोठं पद द्या, त्यांना शुभेच्छाच आहेत, असं उपरोधिक बोलत प्रकाश सोळंके यांनी थेट पक्षश्रेष्ठीवर निशाणा साधला.

अजित पवार का म्हणाले?

धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना क्लीनचीट दिली. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांची आणखी एका प्रकरणात चौकशी सुरूय. त्यातही क्लीनचीट मिळाली तर आम्ही मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद देण्याबाबत विचार करू, असं विधान अजित पवारांनी केलंय.

अजित पवारांच्या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. मुंडे यांना मंत्रिमंडळात घेण्याची घाई केली जात आहे, असाही हल्लाबोल विरोधकांनी केला. आता मुंडेंच्या वापसीवरून राष्ट्रवादीत मतभेद असल्याचं दिसत आहे. आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुडेंना शुभेच्छा देताना, पक्षश्रेष्ठींना सल्ला दिलाय. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला मजबूत करण्याचं काम ज्या समाजाने केलं त्या समाजातील एकाही नेत्याला कॅबिनेट किंवा पालकमंत्रिपद मिळालं नाहीये. याचाही पक्षश्रेष्ठींनी विचार करावा.

या जिल्ह्याचा ४५ वर्षाचा इतिहास पाहिला तर या जिल्ह्यातील मराठा समाजाच्या कोणत्याही नेत्याला कॅबिनेट किंवा पालकमंत्रिपद दिलं गेलं नाहीये. अनेकवेळा राज्यमंत्री म्हणून संधी दिली गेली. परंतु राज्यमंत्रिपद हे आमदारापेक्षा वरिष्ठ पद असतं. परंतु त्याला जास्त अधिकार नसतात. मार्यदितपणे मराठा समाजाचा विचार झालाय. त्यामुळे निश्चितपणे विचारसरणी आणि पक्षाच्या धोरणामध्ये मराठा समाज डावलला गेला ही वस्तू स्तिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT