sunetra pawar ncp  Saam tv
महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण? पक्षाचे वरिष्ठ नेते एकाच नावावर ठाम

sunetra pawar ncp : राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झालीये. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे.

Vishal Gangurde

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पोकळी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जोरदार चर्चा

नेत्यांंकडून सुनेत्रा पवार यांच्याच नावाला

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद रिक्त झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून या पदावर कोण विराजमान होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वोच्च पद हे सुनेत्रा पवार यानांच द्यावे, अशी मागणी नेत्यांकडून केली आहे. आता पक्षातील दोन बड्या नेत्यांनीही अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांच्याच नावाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार, हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

अजित पवारांच्या मृत्यूनंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्रिपद घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार, याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर माजी मंत्री माणिकराव कोकाटे आणि आमदार सुनील शेळके यांनी मोठं भाष्य केलं आहे.

आमदार सुनील शुळके म्हणाले, 'आताच चर्चा केला केल्या जाताहेत. आमच्या बैठका होत होत्या. त्यावेळी अजितदादांची आम्हाला विलिनीकरणाबाबत माहिती दिलेली नाही. अजितदादा जाऊन ५ दिवस झालेत. थोडे दिवस जाऊ द्यायला हवेत. आता एवढी घाई कोणासाठी आणि कशाला? या चर्चा कशा आल्या? शरद पवार गटाचे नेते अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नसल्याचा सवाल आमदार सुनील शेळके यांनी केला.

माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मोठं भाष्य केलं. अजितदादांचा उत्तराधिकारी पवार कुटुंबातीलच आणि सुनेत्रा पवार याच असतील. लोकांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतोय. सुनेत्रा पवारच उत्तराधिकारी असतील. अचानक दादा सोडून गेले, त्यामुळे आम्ही पोरके झालो आहोत. आम्ही संपूर्ण अधिकार पवार कुटुंबाला देणार आहे. सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेतील, त्या निर्णयाच्या पाठीशी आहोत. सर्व आमदारांचं एकच मत सुनेत्रा वहिनींशिवाय दुसरा नेता असणार नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT