Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar On BJP Politics: 'कुणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर...', शरद पवारांनी थेट इशारा देत सांगितली रणनीती

Latest News: भाजपकडून सुरु असलेल्या या फोडाफोडीच्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Priya More

Amravati News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (NCP Leader Ajit Pawar) हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चां गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. पण भाजपकडूनच (BJP) या वावड्या उडवल्या जात असून माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जात असल्याचे सांगत अजित पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिले होते. भाजपकडून सुरु असलेल्या या फोडाफोडीच्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार हे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांना अजित पवारांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी सांगितले की, 'भाजपच्या फोडाफोडीवर योग्यवेळी भूमिका घेऊ.' तसंच, जर कुणाला फोडण्याचा प्रयत्न केला तर उत्तर देऊ.', असा इशारा शरद पवारांनी यावेळी दिला.

गेल्या आठवड्यामध्ये अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले होते. अजित पवार हे 40 आमदारांसोबत भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अशामध्ये अजित पवार यांनी अचानक पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले होते. तसंच त्यांचा मोबाईल नॉटरिचेबल झाला होता. त्यामुळे ते नाराज असून भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला जात होता. त्यातच राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवारांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचाली देखील वाढल्या होत्या.

या सर्व घडामोडींनंतर अजित पवार यांनी स्वत: माध्यमांसमोर येत मी कुठेही जाणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यांनी सांगितलं होतं की, 'नव्या समीकरणांच्या फक्त चर्चा पसरवल्या जात आहेत. त्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. माझ्याबद्दल फक्त गैरसमज पसरवले जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो आणि तिथंच राहणार आहोत. भाजप संदर्भातील चर्चा पूर्णपणे चुकीच्या आहेत.' असे सांगत अजित पवार यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey: राज ठाकरेंना मराठी भाषा वादावरुन धमकी देणारे निशिकांत दुबे कोण?

Raju Patil : ठाणे ते कल्याणचा प्रवास हेलिकॉप्टरने, रस्त्याने पलावा पूलाची परिस्थिती बघितली असती; राजू पाटलांचा शिंदेंना टोला

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

SCROLL FOR NEXT