jitendra awhad Saam Tv
महाराष्ट्र

Awhad On Lord Ram : प्रभू राम हे शाकाहारी नव्हते, ते...; राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांचं मोठं विधान

jitendra awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याविषयी मोठं विधान केलं. त्याच्या या विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

(रुपाली बडवे)

NCP Leader jitendra awhad Comment On Lord Ram :

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. भाजपकडून या सोहळ्याची मोठी तयारी केली जातेय. देशभरातून प्रभू रामाच्या मंदिराला अनेक भेटवस्तू दिल्या जात आहेत. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमात प्रभू रामचंद्र यांच्याविषयी मोठं विधान केलं. (Latest News)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. राम (Lord Ram) हे शाकाहारी नव्हता, ते मांसाहारी होते. १४ वर्ष वनवासात राहणारे राम शाकाहारी(Vegetarian) कसे असतील असं विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. एवढ्या वर्ष जंगलात राहून कोण शाकाहारी राहतं का..? प्रभू राम यांच्याकाळात तांदूळ (Rice) अस्तित्वात नव्हतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मग ते तेव्हा काय खात होते. त्यात राम हे क्षत्रिय होते आणि क्षत्रियांचे जेवण हे मांसाहार (non-vegetarian) असतो. यामुळे माझ्या विधानामुळे वाद होण्याची शक्यता नाहीये. जर कोणी माझं विधान वादग्रस्त म्हणत असेल तर कोणी तर मला सांगावे की, राम काय मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी आहेत, ते राम भक्तदेखील आहेत.

पत्रकारांनी त्यांना त्यांच्या विधानावर कायम राहणार का? असा प्रश्न केला त्याला उत्तर देताना आव्हाड म्हणाले 'मी माझ्या विधानावर कायम आहे, जर आपण आधीच्या काळाविषयी अभ्यास केला तर आपल्याला समजेल की, आधीच्या काळातील लोकं हे मांसाहार करायचे'. यावेळी आव्हाडांनी मानवी इतिहासाचा दाखला दिला. ज्यावेळी खाद्य हे उगवत नव्हतं किंवा पिकावल्या जात नव्हतं, त्यावेळी ते लोकं काय खायचे, हे मला सांगावे?. गहू-तांदळाची शेती कधीपासून सुरू झाली, याचा अभ्यास केला पाहिजे. यामुळे राजकारण अभ्यास करून केले पाहिजे, उगाच मैलाना बनण्याची गरज नाहीये. तुम्ही वेद वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की, कोणत्या-कोणत्या प्राण्याच्या मांसाचे सेवन केलं गेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओवेसींचा रामाला नमस्कार; व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Businessman: गाडीतून उतरताच धाडधाड फायरिंग, प्रसिद्ध व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुलालाही असंच संपवलं होतं

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंच्या मेळाव्यासाठी मराठी कलाकारांची फौज, कोण कोण आले?

NASA Warning: पृथ्वीवर आदळणार महाकाय लघुग्रह? नासाचा मोठा इशारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

SCROLL FOR NEXT