गिरीश कांबळे, मुंबई
अयोध्येतील राम मंदिर उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी मंदिराच्या ट्रस्टकडून देशभरातील नेते मंडळींना निमंत्रण पाठवले जात आहेत. दुसरीकडे याच राम मंदिराच्या श्रेयवादावरून राजकारणही सुरु झालं आहे. या राम मंदिरावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 'मी राम मंदिर दर्शनाला जाईल, मला कोणाच्या निमंत्रणाची गरज नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे. (Latest Marathi News)
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील अंगणवाडी सेविका मोर्च्याला हजेरी लावली. या अंगणवाडी सेविकांच्या मोर्च्याला उद्धव ठाकरे संबोधित केले. उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी आज तुमच्यासोबत नेता म्हणून नाही, भाऊ म्हणून आलो आहे. सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. तुम्ही हे आंदोलन मुंबईत आणला आहे. तुम्ही सावित्रीच्या लेकी आहेत. असंख्य ज्योती पेटतात, तेव्हा निर्माण होणारी मशाल सत्ता उलथवून टाकते, एवढी ताकद आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'मी मुख्यमंत्री असताना काही करू शकलो नाही, असं सांगितलं. त्यावेळी राज्य कोरोनाचा सामना करत होतं. तुमचा डिसेंबरपासून लढा सुरू आहे, सरकार तुमचं काही ऐकतं का? आंदोलन पेटलं की मंत्री येतात. पुढच्या अधिवेशनात विषय मार्गी लावू, असं म्हणतात. पण तू पुढच्या अधिवेशनात मंत्री म्हणून राहशील का? तुझं सगळं दिल्लीतून चालतं, असा घणाघात ठाकरेंनी केला.
'सरकार पाडलं नसत तर आज तुम्हाला आंदोलनाला यावं लागलं नसतं. आजही अनेक बालक आहेत, कुपोषणात आहेत. आपण गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो जाहिरातीवर पाहतोय. हे खेकडे खाऊन गुटगुटीत झालेले मंत्री आहे. तुमची ही सगळी पिढी भारत घडवणारी आहे. तुमच्याकडून पिढी घडते, असेही ते म्हणाले.
'सरकार आणण्यासाठी खोके आहेत, पण तुम्हला मानधन द्यायला पैसे नाहीत. तुम्हाला वाटत असेल, भाजपला मत द्या जरूर द्या. आता अयोध्या राम मंदिर होत आहे. तुम्ही रामभक्त नाहीत का ? लाडली योजना आमच्या भगिणीसाठी का नाही ? या लाडली तुमच्या नाहीत का ? तुम्ही कोरोनामध्ये घरोघरी जात होतात म्हणून हे तुमचं श्रेय आहे, असे ठाकरे म्हणाले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.