Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरेंनी अपशकुन करू नये...', नारायण राणेंचा टोला
Maharashtra Politics
उद्धव ठाकरेंनी अंगणवाडी सेविकांच्या संपाला दिलेल्या पाठिंब्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी पाठिंबा देऊन काय होणार आहे. उलट सुटणारा प्रश्न सुटणार नाही. त्यांनी अपशकुन करू नये. त्यांना कोण विचारत नाही. डुबणाऱ्या व्यक्तीने कोणाला पाठिंबा दिला की तो मेला समजा, असा टोला राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
कोकणातील प्रकल्पांना सारखा विरोध केला जातो. आता मी जिल्ह्यात आलोय विरोध करून दाखवा असं आव्हान देतानाच चांगल्या कामाला विरोध करणाऱ्यांनी आयुष्यात काय केलंय? टीका करण्यापलीकडे काही काम राहिलेलं नसून उद्धवसेना संपल्याचा दावा त्यांनी केला.
आम्हीच ओरिजनल आहोत
उदय सामंत बोलतील तसच होईल असे सांगता येत नाही. आम्ही ओरिजनल आहोत. कुठून ही आलो असलो तरी भाजपमध्ये आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघावर आमचा दावा सुरूच आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी भाष्य करू नये. कोण उमेदवार आहे हे आमचा पक्ष ठरवेल. नांदायच असेल मंगळसूत्र घातलं असेल तर त्याचं ( युतीच )पावित्र्य राखल पाहिजे.
महानंद डेअरी एनडीबी हाताळणार
महानंद डेअरी एनडीबी डेअरीने चालवायला घ्यावी अशी विनंती केली आहे. प्रकल्प जाणार नाही हाताळण्याचं काम एनडीबी करणार आहे. महानंद डेअरीतील कामगारांना सहा महिने पगार मिळाला नाही. त्यावर कोण बोलत नाहीत. कोकण रेल्वेवर सहा हजार कोटींच कर्ज आहे. विकासाला एक पैसा नाही. पगार जात नाहीत. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेशी एकत्रित करावी अशी मागणी मी संबंधित मंत्र्यांजवळ केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ठाकरेंनीच रेसकोर्सच्या जमिनीची मागणी केली होती
आदित्य ठाकरेंचे वडील मुख्यमंत्री असताना रेसकोर्सच्या जमिनीची मागणी कोणी केली होती? ते मला विचारा. हेच ठाकरे ती जमीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. काय असेल ते स्पष्ट बोला. महानगरपालिका असताना तिथे काय केले? असा सवाल राणे यांनी यावेळी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

