मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचं फलित काय झालं हे २० तारखेला कळेल. तोपर्यंत आपली मुंबईला जाण्याची तयारी झाली असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर टीका केलीय. (Latest News)
सरकारने (Government) काढलेला कुणबी नोंदीचा जीआर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी रद्द करा, अशी मागणी केलीय. यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारमधील मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. ओबीसी नोंदी रद्द करण्याची मागणी केल्याने त्याने त्याला काहीच कळत नाही त्याचं काढूच नका, ते पूर्ण वेडे झालेले आहेत. मला सांगा ज्यात शासकीय नोंदी सापडल्या त्यात देव जरी आडवायला तरी त्या नोंदी रद्द होतील का? ओबीसी आरक्षण (Reservation) रद्द होऊ शकतो का?
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जर ते कायद्याच्या पदावर राहतो मंत्रिमंडळात काम करतो आणि तुला तेवढे सुद्धा नॉलेज नाही. ज्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या त्या रद्द होत नसतात. जर त्या रद्द झाल्या तर तुमचं आरक्षण १५ मिनिटात रद्द होऊ शकतो. ओबीसींना वाटतय मराठ्यांच्या काही नोंदी सापडले असतील तर त्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे. मात्र छगन भुजबळ दोन समाजात दरी निर्माण करत आहेत त्यामुळे ओबीसी बांधवांना विनंती आहे तो राजकारणी माणूस आहे त्यामुळे तुमच्यात आणि आमच्या दरी नको, असं आवाहनही जरांगे-पाटील यांनी केलं.
एसटी, एससीचे आरक्षण विना अट लागू केलं. आपला मराठवाडा हैदराबाद संस्थानात होता. आता येथील मराठ्यांच्या हैदराबादमध्ये 25 खोल्या भरतील एवढ्या नोंदी सापडल्या आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्राला आणि मराठवाड्याचा फायदा होणार आहे. दरम्यान सरकारने सोयरे शब्दात त्यांनी गफलत केली होती. जिथे आपलं नातं होतं जिथे आपली सोयरीक जुळते ते आपले सगळे सोयरे. आता त्यांनी उलटा शब्द घातला त्यात, आईच्या जातीला देता येत नाही, अरे आम्ही काय बोलतोय ते तर ऐका. त्यांचे शब्द आहेत आता ते त्यांना करावा लागणार आहे.
काल मंत्रिमंडळाची बैठक झाली मात्र त्याचे फलित काय आहे हे २० तारखेपर्यंत समजेल. ज्यावेळेस समाजाच्या पदरात पडायला लागेल त्यावेळेस या बैठकीचा फलित झालं असं वाटायला लागेल, अन्यथा नाही. २० तारखेपर्यंत त्यांना आपण दारे खुले ठेवले आहेत. नुसती चर्चा नको, तुम्ही जर कायदा पारित करणार असता मराठा आरक्षणाचा तर चर्चा. मात्र २० जानेवारीनंतर एकदा जर सराटे अंतरवलीच्या बाहेर टाकला तर चर्चा बंद होईल असेल जरांगे-पाटील म्हणालेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.