Eknath Khadse : एकनाथ खडसे - Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Khadse: भाजपच्या दोन-चार जणांना तुरुंगात टाका: एकनाथ खडसे

केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाया सुरू असून, यावरून एकनाथ खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

जळगाव: केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाया सुरूच आहेत. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या दोन-चार नेत्यांना तुरुंगात टाकलं असतं तर, ही वेळ आली नसती, असं खडसे म्हणाले. ते जळगावमधील कार्यक्रमात बोलत होते.

राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाया सुरू आहेत. महाविकास आघाडीतील अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासह संजय राऊत यांच्याविरोधात विविध प्रकरणांत ईडी, आयकर आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाया करण्यात आल्या आहेत. मात्र, या कारवाया राजकीय सूडातून सुरू आहेत, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. दुसरीकडे, भाजप नेते किरीट सोमय्या हे देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर नवनवे आरोप करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांच्या या कारवायांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिसका दाखवावा. यापूर्वीच भाजपच्या दोन-चार नेत्यांना तुरुंगात टाकलं असतं तर, ही वेळ आली नसती, असं खडसे म्हणाले.

दिलीप वळसे पाटील यांना मी अनेकदा सांगितलं आहे. गृहमंत्रिपदाचा वापर करा. दाखवा एखादा हिसका. दाखवा इंगा. शेकडो प्रकरणं यांची आहेत. दोन-चार भाजप नेत्यांना तुरुंगात टाकलं असतं तर ही वेळ आली नसती. सत्य आहे ते करा. द्वेषाचं राजकारण कुणीही करू नये. जे केलं आहे ते भोगायला लावा, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सांगलीकरांची उडाली दैना

Pune Traffic : चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुकीचा बोजवारा; पुणे-नाशिक महामार्गावर पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वर्ध्यात सुपरफास्ट एक्स्प्रेसवर दगडफेक; गार्डसह ३ ते ४ प्रवासी जखमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भाचे, तरीही शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ का? आमदार बच्चू कडूंचा सवाल

Principal Bribery Case: मुख्याध्यापकाला अटक, लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं; नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT