नीट पेपरफुटीनंतर निकालात घोळ, विद्यार्थी, पालकांचा संताप, NTAवर गंभीर आरोप

Neet 2026 Result Controversy Mark Mismatch Students Protest: पेपरफुटीनंतर आता 'नीट'चा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बीडमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोअर कार्डवरील गुणांमध्ये मोठी तफावत असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे नीट परीक्षेत सरकार पारदर्शकतेचा दावा करत असलं तरी प्रत्यक्षात मात्र, घोळ कायम आहे... पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...
Students protest after alleged discrepancies between OMR sheets and NEET 2026 scorecards, raising questions over NTA’s transparency.
Students protest after alleged discrepancies between OMR sheets and NEET 2026 scorecards, raising questions over NTA’s transparency.saam tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

नीट पेपरफुटी प्रकरण मे महिन्यात देशभरात गाजल्यानंतर 21 जूनला नव्यानं घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याचा प्रकार समोर आलायं. नीट यूजी 2026 परीक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राज्यभरातील नीट परीक्षार्थींना एनटीएच्या भोंगळ काराभाराचा फटका बसलाय. ओएमआर(OMR) आन्सर की नुसार तब्बल 522 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याच्या अधिकृत स्कोअर कार्डवर अवघे 95 गुण दाखवण्यात आलेत. वर्षभर दिवसरात्र एक करून अभ्यास करायचा....त्यानंतर पेपरफुटीनंतर स्वत:ला सावरत पुनर्परिक्षेसाठी सज्जही व्हायचं....आणि त्यानंतर मार्कांचा हा घोळ..

बरं हा एकच प्रकार नाही... बीडच्याच ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनीलाही मिळालेली ओएमआर शीट चुकीची असल्याची तक्रार आहे. या अनपेक्षित निकालामुळे पवार कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. ज्ञानेश्वरीच्या आईला अश्रू अनावर झालेत...

पेपरफुटीचं वादळ अजूनही शमलेलं नसताना आता नीट परीक्षेतील गुणांच्या घोळाचा फटका पुण्यातील विद्यार्थ्यांनाही बसलाय...

दरम्यान नीटच्या नवीन घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांनीही मोघम प्रतिक्रीया देत विद्यार्थ्यांना तक्रार करण्यास सांगितलंय.

एनटीएच्या ढिसाळ कारभारामुळे हक्काचे गुण मिळवूनही विद्यार्थी आणि पालक मानसिक तणावाखाली आले आहेत. एकीकडे देशपातळीवर NEET च्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, राज्यातील या प्रकाराने NTA च्या विश्वासार्हतेचे धिंडवडे निघालेत. हा एनटीएचा दोष आहे की यामागे कुठलं रॅकेट कार्यरत आहे? असाही प्रश्न आता उपस्थित होतोय. या गुणवंत विद्यार्थ्यांना आता न्याय कोण देणार? केंद्र सरकार त्यांच्या मदतीला धावुन येणार का? की विद्यार्थ्यांना कोर्टाची पायरी चढावी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com