मुंबईसह मराठवाड्यात मनसेला मोठी गळती; ३५ मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम

35 Muslim Workers resigned MNS: 12 ते 3 मे सगळ्या मशिंदीमध्ये मौलावीनशी बोलून घ्या, भोंगे उतरवायला सांगा 3 तारखेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही असं राज ठाकरे उत्तरसभेत म्हणाले होते.
35 muslim workers resigned the party of mns
35 muslim workers resigned the party of mnsSaam Tv
Published On

रुपाली बडवे

मुबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या २ एप्रिलच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर मुस्लिम पदाधिकाऱ्यांमधील नाराजी वाढली आहे. मशीदीवरील भोंग्याप्रकरणी केलेल्या वक्तव्यानंतर मनसेतील मुस्लिम कार्यकर्ते नाराज आहेत. त्यानंतर झालेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उत्तर सभेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) ३५ मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. मुंबईसह मराठवाड्यातील 35 पदाधिकाऱ्यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे. (35 muslim workers resigned the party of mns In Mumabai and Marathwada)

हे देखील पहा -

२ एप्रिलच्या गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे काय म्हणाले होते?

मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील, मी धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले २ एप्रिलच्या गुढीपाडव्यातील सभेत म्हटले होते. त्यानंतर पक्षातील अनेक पदाधिकारी नाराज झाले होते. तेव्हापासून मनसेला गळती लागली आहे.

१२ एप्रिलच्या उत्तरसभेत राज ठाकरे काय म्हणाले होते?

ठाण्यात उत्तर सभेचं आयोजन केलं होतं यावेळच्या सभेतील भाषणात बोलताना राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भोंग्याचा विषय लावून धरला. ते म्हणाले, 'मी चुकीचं काय बोललो या मशिदीच्या भोंग्याचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक तेढ कुठे आहे? तुम्हाला अजान पडायची आहे , घरात करा. शहरातली रस्ते फुटपाथ कशासाठी अडवता प्रार्थना तुमची आहे, आम्हाला कशाला ऐकवता? सांगून तुम्हाला समजावत नसाल, तर तुमच्या मशिदी बाहेर आम्ही हनुमान चालींसा (Hanuman Chalisa) लावणार म्हणजे लावणार असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.

तसंच आम्ही धार्मिक वातावरण बिघडवत नाही आहोत हा नाही सामाजिक विषय आहे. आमच्या वृद्ध , विद्यार्थी सगळ्यांना त्रास होतो. 5 वेळा बांग देता एकतर सगळे बेसूर असतात. का आम्ही ऐकायचं रस्त्यावर घाण झाली तर आपण रस्ते साफ करतो. मग कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवायलाच पाहिजेत. राज्य सरकारला माझं सांगणे आहे , आंम्ही मागे हटणार नाही, काय करायचं आहे ते करा या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावू ज्या देशात बंदी आहे , तिथे निमूट पणे ऐकत ना माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत। , तेही बोलतात, तुम्ही करताय ते योग्य आहे.

आज तुमचा रमजान सुरू आहे. आम्ही समजू शकतो आमचेही सण असतात , समजू शकतो सणवार असेल तर समजू शकतो. पण 365 दिवस ऐकवतोय, कशासाठी कोणासाठी 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकार, गृह खात्याला विनंती आहे. आम्हाला कुठलाही धार्मीक तेढ निर्माण करायचा नाही, महाराष्ट्राचा स्वास्थ्य आम्हाला बिघडवायच नाही.

35 muslim workers resigned the party of mns
सोमय्यांचा १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा लवकरच बाहेर काढणार: संजय राऊत

पण, आज 12 तारीख आहे, 12 ते 3 मे सगळ्या मशिंदीमध्ये मौलावीनशी बोलून घ्या, भोंगे उतरवायला सांगा 3 तारखेनंतर आमच्याकडून कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही. सर्वोच्च न्यालयायाने जर असा निर्णय देत असेल, तर सरकार त्याकडे का दुर्लक्ष करतंय,मतांसाठी का ? असा सवालही त्यांनी सरकारला विचारला होता. मात्र त्यामुळे आता मनसेला गळती लागली असून मुस्लिम कार्यकर्त्यांना राज ठाकरे कसं समजवणार असा प्रश्न उपस्थित होतो.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com