Breaking News, Dhananjay Munde saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde Car Accident : धनंजय मुंडेंच्या कारला अपघात

आमदार धनंजय मुंडे मंगळवारी सर्व कार्यक्रम आटोपून मध्यरात्री परळी शहरात येत होते.

विनोद जिरे

Dhananjay Munde Car Accident : राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde Latest Marathi News) यांच्या गाडीला काल मध्यरात्री परळी शहरात अपघात झाला. यात धनंजय मुंडे यांच्या छातीला किरकोळ मार लागला आहे. दरम्यान पुढील उपचारासाठी त्यांनी मुंबईत नेणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. (Breaking Marathi News)

धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान आपली तब्येत व्यवस्थीत असून काळजीचे कसलेही कारण नसल्याचे आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे (dhananjay munde) मंगळवारी सर्व कार्यक्रम आटोपून मध्यरात्री परळी शहरात येत होते. मध्यरात्री दीड वाजता त्यांच्या चालकाचा वाहनावरचा (vehicle) ताबा सुटल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात किरकोळ मार लागला असून आपल्या तब्येतीबाबत काळजीचे कारण नसल्याचे स्वतः धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडेंना ब्रीज कँडीत हलवणार

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या बरगड्यांना मार बसला आहे. त्यांना मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना मुंबईत विमानाने आणले जाणार आहे. धनंजय मुंडे यांनी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ब्रीज कँडीत दाखल होतील अशी माहिती देण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss: वजन कमी करण्यासाठी 'हे' नॅचरल फॅट बर्नर पदार्थ रोज खा!

Congress: 'बिडी-बिहार'च्या पोस्टनं राजकारण तापलं; वादानंतर काँग्रेसचा माफीनामा

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT