Ajit pawar  Saam TV
महाराष्ट्र

Video : 'मी दूधखुळा नाही...'; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर अजित पवार चांगलेच भडकले

शरद पवारांच्या या नाराजीच्या चर्चेवर अजित पवार यांनी आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल असंसदीय शब्द वापरला. त्यानंतर जयंत पाटील यांच्यावर अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई केली. मात्र, या कारवाईवर अजित पवारांनी संयमी भूमिका घेतली. अजित पवार यांच्या या भूमिकेवर शरद पवार नाराज असल्याची चर्चा होती. शरद पवारांच्या या नाराजीच्या चर्चेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आता पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

अजित पवार (Ajit Pawar) हे आज, अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, 'शरद पवार नाराज आहेत हे धांदात खोटं आहे. तुम्हाला हे कोणी सांगितलं. शरद पवारांनी फोन करून सांगितलं का? तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे'. तसेच, 'मी साहेबांच्या रोज संपर्कात असतो. तुमच्या ज्ञानात कोणी अशी भर घातली?असा सवाल अजित पवार यांनी केला.

'तुम्हाला ब्रेकींग न्यूज मिळत नाही. म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या पसरवता. लोकांच्या मनात समज-गैरसमज निर्माण करता. मी विरोधी पक्षनेता असून माझं काम मला कळतं. मी दूधखुळा नाही. मी ३२ वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारा माणूस आहे. त्याच्यावरून माझी काळजी करू नका, असे अजित पवार पुढे म्हणाले.

'मला ज्या आमदारांनी विरोधी पक्षनेते पद दिलं आहे, त्यांना याबद्दल काय वाटतं, ते आम्ही बघू. आपण महागाई, महापुरुषांच्या विरोधात अपमानास्पद शब्द वापरताहेत.सीमावादाबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक भूमिका घेत आहेत. मात्र, आपल्या येथे तसं घडताना दिसत नाही. ठराव होताना दिसत नाही. विदर्भाचे प्रश्न आहे. मागासलेल्या भागाचे प्रश्न आहेत. ते खूप महत्वाचे आहेत, असेही ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

माजी मुख्य निवडणूक आयुक्त देश सोडून पळाले? व्होटचोरीच्या आरोपामुळे परदेशात पलायन?

Meningitis Symptoms : जास्त डोकेदुखी धोकादायक! ही लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या

Maharashtra Rain: राज्यात इतका धुव्वाधार पाऊस पडतोय कसा? पुढील 4 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे!

Panvel Election: पनवेल विधानसभेत ८५ हजार दुबार मतदार, खोपोलीनंतर पनवेलमधील घोळ उघड

SCROLL FOR NEXT