Jaykumar Gore Accident : आमदार गोरे अपघातातून थोडक्यात बचावले, वडिलांच्या मनात वेगळीच शंका; म्हणाले...

आमदार गोरे यांच्या अपघातावरून त्यांचे वडील भगवान गोरे यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे.
Jaykumar Gore Accident Update
Jaykumar Gore Accident UpdateSaam Tv
Published On

Mla Jaykumar Gore Health Update : सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला आज, शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. सध्या आमदार जयकुमार गोरे यांची तब्येत स्थिर आहे. मात्र, आमदार गोरे यांच्या अपघातावरून त्यांचे वडील भगवान गोरे यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. त्यामुळे आमदार गोरे यांच्या वडिलांच्या प्रतिक्रियेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

Jaykumar Gore Accident Update
Mla Jaykumar Gore : आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात (Accident) झाल्यानंतर त्यांचे वडील भगवान गोरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर भगवान गोरे यांनी रुग्णालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

भगवान गोरे म्हणाले, 'माझं जयकुमार गोरे यांच्याशी बोलणं झालं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्यासारखं कारण नाही. मला अपघात झाल्यानंतर बीपीचा त्रास असल्यामुळे मला कळविले नाही. अपघात घडल्यानंतर मला फलटणवरून कॉल आला. त्यानंतर जोडीदारासोबत रुग्णालयात आलो'.

'अपघातावेळी नेमका काय झालं हे वरच्यालाच माहीत असेल. पण रस्त्यावर ट्रॅफिक नसताना अपघात झाला. त्यामुळे या अपघाताबाबत मला शंका वाटत आहे. अपघातास्थळी मी गेलो होतो. तिथे अपघात होण्यासारखे काही नाही, असा संशय भगवान गोरे यांनी व्यक्त केला आहे

मला आमदार गोरे यांनी मला तब्येत ठीक असून आपण घरी जावा सांगितलं. मला वाटतं ते बोललो. फलटणमध्येच सातत्याने अपघात घडत आहे. त्यामुळे मला शंका वाटत आहे. मी कोणावर संशय घेऊ शकत नाही, असेही त्यांनी सांगितले.

Jaykumar Gore Accident Update
Jaykumar Gore : भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला भीषण अपघात; अंगाचा थरकाप उडवणारे PHOTO पाहा

दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी भगवान गोरे यांच्या शंकेवर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार पडळकर म्हणाले, 'मी त्यांचं विधान ऐकलं नाही. ते झोपेत होते म्हणून नेमकं काय झालं? हे त्यांना देखील माहिती नाही. त्यांच्या वडिलांना जर शंका असेल तर, त्या बाबतीत नक्कीच कठोर भूमिका घेतली जाईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com