Maharashtra Politics: दिशा सालियान प्रकरणी SIT चौकशी का?; शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी सांगितलं कारण

दिशा सालियान प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती.
Maharashtra Politics, Eknath Shinde And Devendra Fadnavis
Maharashtra Politics, Eknath Shinde And Devendra FadnavisSaam tv
Published On

Maharashtra Politics News : दिशा सालियान मृत्यू प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरेंवर आरोप करतानाच, या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली. त्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. त्यात आधी खोकेवाल्यांची एसआयटी चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांच्या या टीकेला राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे.

दिशा सालियान प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केल्यानंतर, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तशी घोषणा केली. एसआयटी चौकशी करण्यात येईल, असं फडणवीसांनी विधानसभेत जाहीर केलं. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. संजय राऊत यांनीही यावरून नेम साधला. खोकेवाल्यांची चौकशी आधी करावी, असं संजय राऊत (Sanjay Raut)  म्हणाले होते. त्याला मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे.  (Latest Marathi News)

Maharashtra Politics, Eknath Shinde And Devendra Fadnavis
Video: मोदी हिंदुत्ववादी नाहीत, शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक; सुब्रह्मण्यम स्वामी यांचं धक्कादायक विधान

कोणतीही चौकशी काही पुरावे असल्यास किंवा पुरावे दिल्यास एसआयटी चौकशी लागते. दिशा सालियान प्रकरणी काही तथ्ये आणि काही पुरावे तक्रार करणाऱ्यांनी दिले. त्यामुळे एसआयटी चौकशी सुरू झाली, असं मुनगंटीवार म्हणाले. जर संजय राऊत यांनी कोणत्या बँकेचे एफडीआर तोडले, कॅश ट्रान्झॅक्शन, कार नंबर दिले तरच एसआयटी चौकशी करेल, असंही ते म्हणाले. (Maharashtra Political News)

Maharashtra Politics, Eknath Shinde And Devendra Fadnavis
Sanjay Raut Live : "५० खोक्यांसाठी SIT स्थापन करा"; खासदार संजय राऊत Live । SAAM TV

'संजय राऊतांवर मानसिक उपचार करायला हवेत'

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनं भाजप नेते संतापले आहेत. प्रसाद लाड यांनीही राऊतांना लक्ष्य केलं. राऊत यांची परिस्थिती चोर मचाए शोर अशी झाली आहे. आपण बोलतोय काय, करतोय काय याचे भानही त्यांना राहिलेले नाही. जे भूखंड घोटाळ्याचे आरोप मुख्यमंत्री शिंदेंवर करत आहेत, ते स्वतः भूखंड घोटाळ्यात १०० दिवस तुरुंगात राहिलेले आहेत, असा घणाघाती टोलाही लाड यांनी लगावला. त्यांना आपल्या बुद्धीचा विसर पडला आहे. म्हणून त्यांच्यावर मानसिक उपचार करायला हवेत, असेही ते म्हणाले.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com