Moreshwar Temurde Saam Tv
महाराष्ट्र

Moreshwar Temurde : राष्ट्रवादीचे माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे 82 व्या वर्षी निधन झाले आहे.

साम टिव्ही ब्युरो

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वरोरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे 82 व्या वर्षी निधन झाले आहे. वरोरा येथे राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मोरेश्वर टेमुर्डे यांच्या निधनाने वरोरा विधानसभा क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले,1 मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे. (Latest Marathi News)

अॅड. मोरेश्वर टेमुर्डे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय होते. टेमुर्डे यांनी 1991 ते 1995 आणि 95 ते 2000 या काळात दोनदा वरोरा क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले. अॅड. मोरेश्वर टेमुर्डे हे 1991 -95 या काळात विधानसभा उपाध्यक्ष होते.

टेमुर्डे यांचा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या उभारणीत मोठा वाटा होता. राजकारणात अत्यंत सक्रिय असलेले अॅड. टेमुर्डे राजकीय स्थितीवर पोटतिडकीने भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने टेमुर्डे कुटुंबावर दु:खाच डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले 1 मुलगी व मोठा परिवार आहे.

राजकीय स्थितीवर पोटतिडकीने भाष्य करणारे टेमुर्डे यांना सामाजिक भान होते. राजकीय सामाजिक कार्यातही अग्रेसर होते. त्यांच्या कार्यामुळे टेमुर्डे यांनी वरोरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उभारणीत टेमुर्डे यांनी मोठा हातभार लावला. त्याचीच पोचपावती म्हणून 1991 -95 या काळात विधानसभा उपाध्यक्ष मिळाले होते.

माजी आमदार अॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे 82 व्या वर्षी राहत्या घरी झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. टेमुर्डे यांचे पार्थिव वरोरा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. टेमुर्डे यांच्या इच्छेनुसार त्यांचा मृतदेह चंद्रपूर (Chandrapur) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला सोपविण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT