Ajit Pawar Vs Sharad Pawar saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar On Sharad Pawar: वय झालं, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांना सवाल

NCP Crisis Live News Updates: पुन्हा दोन दिवसात काय झालं माहित नाही, पुन्हा सांगितलं की मी राजीनामा मागे घेतो. मागेच घ्यायचा होता, तर दिलाच कशाला? तेही कळलं नाही.

Chandrakant Jagtap

Ajit Pawar's Question to Sharad Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एमईटी येथे झालेल्या बैठकीत बोलताना शरद पवार यांना, तुमचं वय झालंय, तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? असा सवाल केला आहे.

अजित पवार म्हणाले, काल आपले वरिष्ठ नेते चव्हाण साहेबांच्या समाधीच्या ठिकाणी गेले. ठिक आहे चव्हाण साहेब आपल्या सर्वांचे दैवत आहे. माझ्याकडूनही घोडचूक झाली होती. मी तिथे सकाळी 7 वाजल्यापासून ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत न पाणी पिता बसलो होतो. मला ते खूप मनाला लागलं होतं. परंतु मित्रांनो आता वय 82 झालं, 83 झालं तुम्ही कधी थांबणार आहा की नाही? तुम्ही आशिर्वाद द्या ना... आम्हाला वाटतं तुम्ही शतायुषीय व्हावं, असे अजित पवार म्हणाले,

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, "मला सांगितलं मी आता राजीनामा देतो आणि वेगवेगळ्या संस्था बघतो. राजीनामा दिल्यानंतर मी एक कमिटी करतो. ती कमिटी केल्यावर प्रफुल्ल पटेल, तटकरे, मी, जंयत पाटील, भुजबळ साहेब, अनिल देशमुख, धनंजय मुंडे तुम्ही सगळे प्रमुख बसा आणि सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा. आम्ही तयार झालो, तेही आम्हाला मान्य होतं. पुन्हा दोन दिवसात काय झालं माहित नाही, पुन्हा सांगितलं की मी राजीनामा मागे घेतो. मागेच घ्यायचा होता, तर दिलाच कशाला? तेही कळलं नाही". (Maharashtra Politics)

"आज आमच्या धमक किंवा ताकद नाही का सरकार चालवण्याची, आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चार पाच जणांकडे प्रमुख नेते म्हणून पाहिले जाते, त्याच्यात माझं नाव कुठेतरी येतं की नाही? मग आम्हाला का आशिर्वाद दिला जात नाही. घरात देखील 60 वर्ष झाल्यानंतर नवीन मुलगा आला की त्याला सांगितलं जातं. बाबारे आता तू 25 वर्षांचा झालाय, तु शेती बघायची. मी तुला सल्ला देईन. ही पद्धत आहे. उद्योगपतींची देखील हीच पद्धत आहे", असेही ते म्हणाले. (Latest Political News)

मी सुप्रियाशी बोललो, "आपण एका घरातले आहोत, सोबत लहाणाचे मोठे झाले आहोत, काहीतरी सांग. म्हणाली, ते हट्टी आहेत, ते ऐकत नाही कुणाचं. असला कसला हट्टं आहे. आम्ही आदर करतो. पण काही आमदारांना बोलवलं जातं, ते नाही भेटले तर त्यांच्या पत्नीला फोन केला जातो. त्यांना भावनिक केलं जातं", असा आरोप देखील अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर केला आहेत. उद्या त्यांनी दौरा सुरु केला तर मलाही दोरे सुरू करुन त्यांना उत्तर द्यावे लागेल असेही अजित पवार म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळांच्या विजयाचा मोठा जल्लोष; जेसीबीतून फुलांचा वर्षाव

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

SCROLL FOR NEXT