Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच गोंधळ उडालाय. अशात आज मुंबईमध्ये अजित पवार आणि शरद पवार अशा दोन्ही गटांकडून शक्तिप्रदर्शन सुरु आहे. यावेळी सभेदरम्यान अजित पवार आक्रमक भाषण करताना अचानक भावूक झाले. (Latest Ajit Pawar News)
मुंबईच्या वांद्रे येथे अजित पवार समर्थकांकडून शक्तिप्रदर्शन सुरु आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना अजित पवारांनी म्हटलं की, २०२४ ला निवडणुका होतील त्यामध्ये २००४ मध्ये ७१ चा आकडा आहे. तो पुढे घेऊन जाणारच. महाराष्ट्र पिंजून काढू, पायाला भिंगरी बांधल्यासारखं फिरु. माझ्या दैवताला विनंती आहे, वरिष्ठांना विनंती आहे, की अजूनही विठ्ठलानं आशीर्वाद द्यावा, अशा शब्दांत अजित पवारांनी शरद पवारांना भावनीक साद घातली.
चार पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, माझा तर रेकॉर्ड आहे
मी आता चार पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो, माझा तर रेकॉर्ड आहे. पण गाडी पुढे काही जात नाही. मला मनापासून वाटतं मी राज्याचा प्रमुख व्हावं. काही गोष्टी राबवायच्या आहेत, म्हणून प्रमुख व्हावं वाटतं. आज राष्ट्रवादी आपल्याला सगळ्यांना मिळून पुढे न्यायचं आहे. पक्ष चिन्ह आपल्याकडे राहायचं आहे, त्याला कुठेही दृष्ट लागू द्यायची नाही,अशा सूचना अजित पवारांनी आपल्या समर्थकांना केल्यात.
७१ चा आकडा आहे, तो पुढे घेऊन जाणारच
आपला राष्ट्रीय पक्ष आता राज्याचा झाला. राष्ट्रीयत्वाची मान्यता रद्द झाली. ती परत मिळवायची आहे. हे जे काही तुमच्या सगळ्यांच्या मदतीने केलंय, नेत्यांच्या मदतीने केलंय. २०२४ ला निवडणुका होतील त्यामध्ये २००४ मध्ये ७१ चा आकडा आहे. तो पुढे घेऊन जाणारच, असा विश्वास देखील अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.