Ajit Pawar Speech : भाजपसोबत चर्चेला साहेबांनीच पाठवलं, पहाटेच्या शपथविधीवर अजित पवार पहिल्यांदाच एवढं स्पष्ट बोलले

NCP Political News : अजित पवारांनी आपल्या भाषणात अनेक गौप्यस्फोट करत शरद पवारांच्या भूमिकांवर संशय निर्माण केला.
Ajit Pawar
Ajit Pawar saam tv
Published On

Ajit Pawar Speech : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांचे कार्यक्रम मुंबईत पार पडत आहे. दोन्हीकडे अजित पवार आणि शरद पवार समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. अजित पवारांनी आपल्या भाषणात अनेक गौप्यस्फोट करत शरद पवारांच्या अनेक राजकीय भूमिकांवर संशय निर्माण केला.

२०१९च्या पहाटेच्या शपथविधीवर पहिल्यांदाच अजित पवारांनी उघडपणे भूमिका मांडली. २०१९ला भाजपसोबत जायचा निर्णय पवार साहेबांनीच घेतला होता. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून मला ही जबाबदारी दिली गेली होती, असं अजित पवार यांनी म्हटलं.

Ajit Pawar
Maha Political Twist: राष्ट्रवादीच्या आमदारांना १०० खोक्यांची ऑफर? ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

सर्व चर्चा झाल्या, पाच बैठका झाल्या. मला सांगितले कुठे बोलायचं नाही. त्यानंतर जे घडलं तुम्हाला सगळं माहिती आहे. पण मला उगच बदनाम केलं जात आहे. त्यानंतर अचानक बदल झाला आणि सांगितले की आपल्याला शिवसेनेसोबत जायचं आहे. आधी शिवसेना जातीवादी मग मित्र कसा झाला, असा सवालही  अजित पवार यांनी उपस्थित केला.

मला विलन केलं

आमची बोलणी भाजपशी सुरू होती, तोपर्यंत शिंदे साहेबांचा शपथविधी झाला नव्हता. मला लोकांसमोर विलन केलं जातं. मला कळत नाही माझी काय चूक आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं. (Latest Marathi News)

Ajit Pawar
Sharad Pawar Vs Ajit Pawar: राष्ट्रवादीत पॉवरफुल कोण? पुण्यातील बडे नेते कोणाला साथ देणार? लवकरच स्पष्ट होणार

२०१७मध्ये भाजपशी बोलणी झाली

भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा करावी यासाठी आम्हाला पाठवलं होतं. जर भाजप सोबत जायचं नव्हतं तर पाठवलं तरी कशाला? २०१७ ला सुद्धा वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. दोन्ही बाजून बडे नेते या चर्चेला उपस्थित होते. मी कधीही महाराष्ट्राशी खोटं बोलणार नाही, खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही असे अजित पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com