सचिन जाधव
Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय भूमिकेमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यात विशेष म्हणजे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पाहिल्यापासून बालेकिल्ला राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर आज पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या आमदारांची आणि जिल्हाध्यक्षांची तसेच इतर पदाधिकार्यांची सत्त्वपरीक्षा होणार आहे. (Latest Marathi News)
आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार या दोघांनीही मुंबईत पक्षाचे खासदार,आमदार, विधान परिषदेचे सदस्य आमदार, जिल्हाध्यक्ष तसेच राज्य कार्यकारिणी सदस्यांची बैठक आयोजित केल्याने यापैकी कोणत्या बैठकीला जायचे, यावरून या पदाधिकार्यांची चांगलीच अडचण झाली आहे. या बैठकीतून कोणत्याकडे गटाकडे किती आमदार-खासदारांचं संख्याबळ आहे, हे दिसून येणार आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांच्या शपथविधीला हजर असलेल्या आमदारांपैकी पुणे जिल्ह्यातील मावळचे आमदार सुनील शेळके आणि सुनील टिंगरे वगळता इतर कोणत्याही आमदाराने पुढे येऊन अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे पुन्हा स्पष्टपणे सांगितलेले नाही. तर शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी शरद पवारांना पाठिंबा दर्शविला आहे.
पक्षाचे शिरूरचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. सुनील शेळके आणि सुनील टिंगरे यांना सोडून इतर चार आमदारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही.
या चारही आमदारांचं राजकारणाशिवाय पवार कुटुंबाशी विशेषत: शरद पवार यांच्याबरोबर भावनिक संबंध आहेत, तसेच या चारही आमदारांच्या राजकीय जीवनातही शरद पवार यांची मोठी भूमिका असल्याने काय आणि कसा निर्णय घ्यावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
पुणे जिल्हयातील राष्ट्रवादीचे बरेचसे विद्यमान आमदार अजित पवार सोबत आहे. मात्र २०१९ विधानससभेची स्थिती पाहता अनेक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा भाजप आहे.
१) बारामती
- खासदार सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी काँग्रेस
पराभव कांचन कुल - भाजप
२) शिरूर
खासदार डॉ अमोल कोल्हे- विजयी राष्ट्रवादी काँग्रेस
शिवाजीराव आढळराव पाटील पराभव - शिवसेना
३) मावळ
- खासदार श्रीरंग बारणे - शिवसेना शिंदे गट
पार्थ पवार - राष्ट्रवादी काँग्रेस
१) बारामती
- अजित पवार - राष्ट्रवादी काँग्रेस
गोपीचंद पडळकर - भाजप
२ ) शिरुर
- अशोक पवार - राष्ट्रवादी काँग्रेस
बाबुराव पाचार्णे- भाजपा
३ ) खेड
- दिलीप मोहिते पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस
अतुल देशमुख - भाजपा
४) आंबेगाव
- दिलीप वळसे पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस
राजाराम बाणखिले - शिवसेना
५) जुन्नर
- अतुल बेनके - राष्ट्रवादी काँग्रेस
शरद सोनवणे - शिवसेना
६) मावळ
- सुनील शेळके - राष्ट्रवादी काँग्रेस
बाळा भेगडे - भाजप
७) इंदापूर
- दत्ता भरणे - राष्ट्रवादी काँग्रेस
- हर्षवर्धन पाटील - भाजप
८) वडगाव शेरी
- सुनील टिंगरे - राष्ट्रवादी काँग्रेस
जगदीश मुळीक - भाजप
९ ) हडपसर
- चेतन तुपे (भूमिका स्पष्ट नाही) - राष्ट्रवादी काँग्रेस
योगेश टिळेकर - भाजप
१०) पिंपरी
- अण्णा बनसोडे आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस
गौतम चाबुकस्वार - शिवसेना
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची ही सगळी पक्षीय स्थिती पाहता अजित पवार यांच्या पाठीमागे नेते असले तरी कार्यकर्ते कुठे जातात त्याची भूमिका काय आहे हे महत्वाचे ठरणार आहे. आताच्या स्थिती अजून भूमिका स्पष्ट नसल्याने अनेकजण संभ्रमात आहेत.
दुसरीकडे पुणे जिल्ह्यात आपलं प्रस्थ वाढवण्यासाठी भाजप ही जोरदार मोर्चाबांधणी करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अजून राजकीय गणित बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना येणार काळ सोपा नाही एवढं मात्र निश्चित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.