Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार स्वत: उतरणार मैदानात

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : एकनाथ शिंदे गटाने बंडाळी केल्याने राज्यात सत्तांतर झालं. शिंदे-फडणवीस सरकारने (Maharashtra Government) महाराष्ट्रात सत्तेच्या चाव्या हाती घेतल्यानंतर महाविकास आघडीतील घटक पक्ष खडबडून जागे झाले आहेत. शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनाला मोठा धक्का बसल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. अत्यंत महत्वाची समजली जाणारी मुंबई महापालिका निवडणूक (bmc election) जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) स्वत: मैदानात उतरले आहेत. बीएमसीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला वेळ देण्यासाठी स्वत: मुंबईत फिरणार असल्याचं आश्वासन पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शरद पवार यांनी सूत्र हातात घेतली आहेत. पवार मुंबईत स्वतः फिरणार असून पक्षाला वेळ देणार आहेत. कोणता पक्ष सोबत आपल्यासोबत येईल किंवा नाही येणार, याचा विचार न करता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आदेशही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पवार यांनी दिले आहेत. दरम्यान, मुंबईच्या प्रत्येक वॉर्ड मधील परिस्थिती काय आहे, याचा अहवाल पवार यांना देण्यात येणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत आपण स्वतः लक्ष देणार असल्याचं शरद पवार यांनी पदाधिकऱ्यांना आश्वासनं दिलं आहे. तसेच राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार यांनी नवाब मलिक यांचा देखील उल्लेख केला. मुंबईत नवाब मलीक यांनी विरोधकांच्या विरोधात आवाज उठवला म्हणून मलिक यांच्यावर कारवाई झाली, मात्र अद्याप त्यांच्या विरोधात ठोस पुरावे सादर होऊ शकले नाहीत, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास १५ वर्षे काँग्रेससोबत संसार केला. मात्र त्यातही काही ठिकाणी वेगळ्या निवडणुका लढवण्याची भूमिकाही घेतली. यातून केवळ समोरील विरोधकांचा पराभव झाला पाहिजे ही भूमिका होती. येत्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि काँग्रेसकडून त्यांची भूमिका लवकरच मांडण्यात येईल. पण भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येऊन लढण्याची जिथे गरज असेल, तिथे तशी भूमिका घ्यायची. अधिवेशन काळात पक्षाच्यावतीने विधानसभेत आक्रमक भूमिका मांडण्याचे काम निश्चितपणे होईल. जिथे सत्ताधारी चुकीचे असतील तिथे आवाज नक्कीच उठवू आणि जिथे योग्य असेल तिथे राजकारण करण्याची भूमिका घेणार नाही,अशी ग्वाही अजितदादांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत दिली होती.

Edited By - Naresh shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT