Ajit Pawar Gets Clean Chit Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधानसभेसाठी अजित पवारांचे मेगा प्लॅनिंग! आजपासून जनसन्मान यात्रेला सुरूवात; महाराष्ट्र पिंजून काढणार

NCP Jan Samman Yatra Nashik: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असेल. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा होणार आहे.

Gangappa Pujari

नाशिक, ता. ८ ऑगस्ट २०२४

राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी महायुती- तसेच महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जन सन्मान यात्रेला सुरुवात होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमधून विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरूवात होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सगळे मंत्री, आमदार, पदाधिकार्यांच्या उपस्थितीत दिंडोरीतून या यात्रेची सुरुवात होणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जन सन्मान यात्रेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असेल. यावेळी अजित पवार यांच्या हस्ते नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा होणार आहे.

नाशिकच्या काळारामाचे दर्शन घेऊन अजित पवार विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर असतानाअजित पवार हे काळारामाचे दर्शन घेणार असून मोदी ,गडकरी, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यानंतर आता अजित पवार विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काळारामाचे दर्शन घेणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

SCROLL FOR NEXT