NAVTAPA BEGINS IN VIDARBHA IMD ISSUES HEATWAVE ALERT TILL JUNE 2 saam tv
महाराष्ट्र

विदर्भात आजपासून 'नवतपा'! 25 मे ते 2 जूनपर्यंतचा काळ धोक्याचा; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

Heat Wave Alert in Vidarbha: विदर्भात नवतपाला सुरुवात झाली असून तापमान ४६°C पर्यंत पोहोचले आहे. यामुळे तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. उष्माघाताच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने (IMD) २ जूनपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

Bharat Jadhav

  • विदर्भात आजपासून नवतपाला सुरुवात झाली.

  • अमरावतीत तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचले.

  • उष्माघातामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती.

विदर्भात आजपासून ‘नवतपा’चा प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशीच उष्णतेचा भीषण तडाखा जाणवला आहे. अमरावतीमध्ये तापमान तब्बल ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. गेल्या दोन दिवसांत उष्माघातामुळे अमरावती जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगात सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील जिल्ह्यांमध्ये होत आहे. विदर्भातील अनेक जिल्हे उन्हामुळे होरपळून निघत आहेत. राज्यात सर्वाधिक ७६ टक्के वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यानेही यावर्षी १९९२ चा ४६.३ अंश सेल्सिअस तापमानाचा रेकॉर्ड मोडत ४६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे.

नवतापा म्हणजे काय?

नवतापाच्या काळात गेल्या काही वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. विदर्भात मागच्या १५ दिवसापासून सलग उष्णतेची लाट सुरू आहे. आजपासून नवतापा सुरू होत आहे. नवतापा म्हणजे उन्हाळ्यातील सर्वाधिक उष्ण नऊ दिवस. आधीच विदर्भातील बहुतांश जिल्हे तापमानाने अक्षरशः भाजून निघत असताना यात आता नवतपा दरम्यान तामापन अधिक वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदा नवतापा २५ मे पासूनसुरू होऊन २ जूनपर्यंत असणार आहे.

विदर्भात रविवारी सर्वाधिक तापमान ब्रह्मपुरी येथे ४७.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. त्याखालोखाल चंद्रपूर ४५.६, गडचिरोली ४५.२,अमरावती ४५.२, नागपूर ४५.४, वर्धा ४५.५, अकोला ४३.४, गोंदिया ४५ आणि भंडारा ४४.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. नागपूर वेधशाळेने आज देखील विदर्भातील अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला.

तर नागपूर, यवतमाळ, अकोला आणि गडचिरोली या जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे गरज नसतांना दुपारच्या वेळेला घराबाहेर पडू असे आवाहन नागरिकांना केले. राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० ते ४५ अंशावर गेलाय. यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

नवतपामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्याल?

भरपूर पाणी प्या: दिवसभरात सतत पाणी, लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा ओआरएस (ORS) घेत राहावे. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भासणार नाही.

थेट सूर्यप्रकाशापासून बचाव करा: सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर जाणे अत्यंत आवश्यक असल्यास छत्री, टोपी आणि सनग्लासेसचा वापर करावा.

हलके व सुती कपडे: घाम शोषून घेणारे आणि सैलसर सुती कपडे घालावीत. गडद रंगांऐवजी हलक्या रंगांचे कपडे प्राधान्याने वापरा.

आहार: पचनास हलके आणि ताजे अन्न खावेत. कलिंगड, टरबूज, काकडी यांसारख्या पाण्याने समृद्ध फळांचा आहारात समावेश करावा.

अति-थंड पदार्थ टाळा: खूप थंड पाणी, बर्फाचे गोळे किंवा कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 qualifier-1 : क्वालिफायर १ सामना पावसात वाहून गेला तर...; कोणता संघ फायनलमध्ये धडकणार? जाणून घ्या समीकरण

Maharashtra News Live Update: परभणीत पेट्रोल पंप चालकांडून पंपावर पोलिस बंदोबस्ताची मागणी

Ranveer Singh: रणवीर सिंहला 'डॉन 3'मधून एक्झिट घेणं पडलं महागात; FWICEने अभिनेत्याला इंडस्ट्रीमधून केलं बॅन

पंतप्रधान मोदींनी दहा वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं: मुख्यमंत्री फडणवीस

लव्ह मॅरेजचा भयानक शेवट! नवऱ्याने 50 वार करून बायकोला भर रस्त्यात निर्घृणपणे संपवलं, सोलापूर हादरलं

SCROLL FOR NEXT