Shardiya Navratri 2023 Saam Tv
महाराष्ट्र

Shardiya Navratri 2023 : नवरात्रौत्सवाला आजपासून प्रारंभ; अंबाबाई-तुळजापूरसह राज्यभरातील मंदिरे सजली, भाविकांची गर्दी

Navratrotsav 2023 : मंदिरात तसेच घराघरांमध्ये शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त जल्लोषाचे वातावरण आहे.

Shraddha Thik

Shardiya Navratri :

शारदीय नवरात्रोत्सवाला आज पासून सुरुवात होत आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण झालं आहे. मंदिरात तसेच घराघरांमध्ये शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त जल्लोषाचे वातावरण आहे. यामुळे आज अनेक ठिकाणी भक्तांनी मनोभावे पूजा करत आराधना केली आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविकांची पहिल्याच दिवसांपासून गर्दी पाहायला मिळते आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आज दुपारी घटस्थापना करण्यात येईल.आज दुपारी 12 वाजता धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना (Ghatasthapana) करण्यात येईल. त्यानंतर पुढील नऊ दिवस देवीचा छबीना मिरवणूक,विविध अलंकार पूजा असे धार्मिक विधी पार पडणार आहेत.तत्पूर्वी शनिवारी रात्रीपासूनच तुळजापूरात भक्तांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसत आहे.

यंदा तुळजाभवानी मंदीराच्या मुख्य महाद्वारासमोर रांजणगाव येथील देवीभक्त नानासाहेब पाचुंदे पाटील यांनी गजलक्ष्मी रथाला फुलांचा आकर्षण देखावा साकारला आहे. यासाठी तब्बल 1200 किलो देशी विदेशी फुलांचा वापर केला आहे. हा देखावा आलेल्या देवी भक्तांसाठी आकर्षणाचा ठरेल.

कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सकाळी (Morning) साडेसात वाजता पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने अंबाबाईच्या गाभाऱ्यात घटाची स्थापना करण्यात आली. अंबाबाईच्या गर्भ गृहांमध्ये घटाची स्थापना करण्यात आल्यानंतर साडेआठ वाजता मंदिर परिसरात तोफेची सलामी देऊन घटस्थापनेला सुरुवात झाल्याचा निरोप देण्यात आला.

नवरात्रौत्सवानिमित्त अंबाबाई मंदिर परिसरात या 9 दिवसांमध्ये विविध धार्मिक (Religious) कार्यक्रमांच्या नियोजन करण्यात येते. त्यानिमित्ताने मंदिर आणि मंदिर परिसरातील लोक सज्ज झाले आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक कोल्हापुरात दाखल होत असतात. याशिवाय सप्तशृंगी गडावर देवीच्या नवरात्रौत्सवाला सुरूवात झालीये. ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब वाघ यांनी पत्नीसोबत देवीच्या आभूषणांची पूजा केली. त्यानंतर आभूषणांची मिरवणूक काढण्यात आली आणि देवीला आभूषणांनी सजवण्यात आले आहे.

नवरात्रौत्सवानिमित्त कार्ला गडावरील श्री एकविरा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता या भागात होणारी वाहतुकी कोंडी सोडविण्याच्या दृष्टिकोनातून कार्ला फाटा ते वेहेरगाव येथील श्री एकविरा देवी पायथा मंदिर दरम्यान 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत पूर्णवेळ अवजड व मोठ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार असल्याची अधिसूचना पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढली आहे. यात्रा काळातील शेवटचे तीन दिवस म्हणजेच 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 6 ते रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान जुन्या पुणे मुंबई लेनवर वडगाव फाटा ते लोणावळा व पुणे लेनवर खंडाळा - कुसगाव टोलनाका ते वडगाव दरम्यान सर्व जड अवजड वाहनांना बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरीचा थरकाप उडवणारा |Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

SCROLL FOR NEXT