लवकरच नवरात्रीचा उत्सव हा महाराष्ट्रासह भारतभर साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला शारदीय नवरात्रौत्सव साजरा केला जातो.
यंदा नवरात्रीचा उत्सव हा १५ ऑक्टोबरपासून ते २४ ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाणार आहे. या काळात दुर्गा देवीच्या ९ रुपांची पूजा केली जाते. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तीपीठ आहे. या साडेतीन शक्तीपीठांना ऊँ काराचे सगुण रुप म्हणून ओळखले जाते. 'अ'कार पीठ माहूर, 'उ'कार पीठ तुळजापूर, 'म'कार पीठ कोल्हापूर आणि अर्धमात्रा सप्तशृंगी.
सप्तशृंगी देवीच्या मूळ ठिकाणी दर्शन होत नाही म्हणून ते अर्धपीठ. साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध्या शक्तीपीठाचे स्थान म्हणून सप्तशृंगीगड आहे. सप्तशृंगी देवीला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे रुप समजले जाते.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी देवी ही साडेतीन पीठांपैकी ते आद्य शक्तीपीठ आहे. महाराष्ट्रातील नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ सप्तशृंगी देवीचे स्थान आहे. ब्रम्हदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरीजा महानदीचे रुप म्हणजे सप्तशृंगी देवी म्हणून ओळखले जाते. या देवीचे अठराभुजा सप्तशृंग रूप पाहायला मिळते. देवीची मूर्ती स्वयंभू असून या मंदिरात दरवर्षी शाकंभरी नवरात्रौत्सवही (Navratri) साजरा केला जातो.
1. या ठिकाणी कसे जाल?
नाशिकला जाण्यासाठी आपण मुंबई (Mumbai)-पुण्याहून ट्रेनने जाऊ शकतो किंवा इतर अनेक बसेसचे पर्याय आहे. गडावर जाण्यासाठी बसेस या नाशिकच्या जुन्या मध्यवर्ती बस स्थानक आणि दिंडोरी नाका येथून मिळतात. नवरात्रीच्या उत्सवात येथे अधिक प्रमाणात एसटी बसेसची सोय करण्यात येते.
भाविका गडावर जाण्यासाठी ट्रस्टने अनेक धर्मशाळा उपलब्ध करुन दिल्या आहेत. संस्थानातर्फे २० रुपयात पोटभर जेवणाची सोयही होते. मुंबई-पुण्याहून नाशिकला जायला साधरणत: ६ ते ८ तास लागतात. तसेच सप्तशृंगी देवी शिवाय या ठिकाणी गडावर कालीकुंड, सुर्यकुंड, दत्तात्राय कुंड अशी कुंड आहेत.गडाच्या पूर्वेकडे खोल दरीने विभागला गेलेला 'मार्कंडेय डोंगर' आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.