Shardiya Navratri Day 1 : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करा शैलीपुत्री देवीची पूजा, जाणून घ्या महत्त्व

Shardiya Navratri 2023 : या दिवशी सर्वप्रथम कलशाची स्थापना विधीपूर्वक केली जाते.
Shardiya Navratri Day 1
Shardiya Navratri Day 1Saam Tv
Published On

Shailiputri Devi Pooja :

हिंदू पंचागानुसार, 15 ऑक्टोबर हा शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. या दिवशी दुर्गेचे पहिले रूप माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी सर्वप्रथम कलशाची स्थापना विधीपूर्वक केली जाते. त्यानंतर, दुर्गा मातेचे आवाहन आणि स्थापना तसेच अभिषेक केला जातो, त्यानंतर शैलपुत्रीची पूजा (Pooja) केली जाते.

माता दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री म्हणून ओळखले जाते. नवदुर्गांपैकी ती पहिली दुर्गा आहे. माता पार्वतीला शैलपुत्री असेही म्हणतात. पर्वतराज हिमालयाच्या घरात (Home) ती कन्येच्या रूपात असल्याने तिचे नाव शैलपुत्री ठेवण्यात आले.

माता शैलपुत्रीची पूजा

सर्वप्रथम पूजेचा आढावा घ्यावा आणि घटस्थापनेनंतर माता शैलपुत्रीची पूजा करावी. त्यांना अक्षता, पांढरी फुले, धूप, दिवा, फळे, मिठाई अर्पण करावे. पूजेदरम्यान मंत्रांचा जप करा आणि नंतर माता शैलपुत्रीची पूजा करा. माता शैलपुत्रीला दुधापासून बनवलेली मिठाई (Sweets) अवश्य अर्पण करा.

Shardiya Navratri Day 1
Navratri Astro Tips : सतत पैशांची चणचण भासते? दूर्गादेवीची अशी करा पूजा, होईल धनलाभ

याशिवाय गायीचे तूपही अर्पण करू शकता. पूजेनंतर माता शैलपुत्रीची तुपाच्या दिव्याने पूर्ण भक्तीने आरती करा. पूजा संपल्यानंतर मनोकामना पूर्ण होण्यासाठी माता शैलपुत्रीची प्रार्थना करा.

माता शैलपुत्रीचा मंत्रांचा जप

असे मानले जाते की माता शैलपुत्रीच्या मंत्रांचा जप केल्याने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता टिकून राहते आणि तिची पूजा केल्याने चंद्रदोषापासून मुक्तता मिळते . तुम्हाला आनंद आणि सौभाग्य देखील प्राप्त होऊ शकते.

  • ऊँ देवी शैलपुत्र्यै नमः॥

  • वन्दे वांच्छितलाभाय चंद्रार्धकृतशेखराम्‌॥ वृषारूढ़ां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम्‌॥

  • शिवरूपा वृष वहिनी हिमकन्या शुभंगिनी। पद्म त्रिशूल हस्त धारिणी रत्नयुक्त कल्याणकारीनी।।

  • या देवी सर्वभूतेषु माँ शैलपुत्री रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥

Shardiya Navratri Day 1
Navratri Fashion | गरबा आउटफिट्सवर शोभून दिसतील या ज्वेलरी

शैलपुत्री मातेला पांढऱ्या वस्तू खूप आवडतात. अशा वेळी पांढऱ्या कपड्यांसोबतच मातेला पांढरी मिठाई आणि तूपही अर्पण करावे. असे म्हणतात. शैलपुत्रीची पूजा केल्याने अविवाहित मुलींना चांगला वर मिळतो आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com