Navi Mumbai Palm Beach car accident SaamTV
महाराष्ट्र

Navi Mumbai Accident : मद्यधुंद अवस्थेत कार दमटावली, पामच्या झाडाला धडकली, एअरबॅग्स खुल्या झाल्या; अन्...

Navi Mumbai Palmbeach Accident : वाहनचालक मद्यधुंद असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कारच्या एअरबॅग्स उघडल्याने वाहनचालक बचावला आहे.

Prashant Patil

नवी मुंबई : राज्यात अपघातांचं सत्र सुरुच आहे. नवी मुंबई येथील पामबीच मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार थेट पामच्या झाडाला धडकली असल्याने हा अपघात झाला आहे. झाडाला जोरदार धडक बसल्याने झाड कोसळले, तर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

वाहनचालक मद्यधुंद असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. कारच्या एअरबॅग्स उघडल्याने वाहनचालक बचावला आहे. नेरुळ येथे बेलापूरला जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीय.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

दरम्यान, वर्ध्याला देखील असाच भीषण अपघात झाला आहे. प्रयागराज येथून कुंभस्नान करून निघालेल्या भाविकांच्या वाहनाला समृद्धी महामार्गवरील येळाकेळी परिसरात अपघात झालाय. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. येळाकेली परिसरात ओव्हरटेक करत असताना कार चालकाला डुलकी आली त्यामुळे कारवरील ताबा सुटला. स्टेअरिंगवरील ताबा सुटल्यामुळे कार थेट बॅरिकेटला धडकली त्यानंतर उलटी झाली. हाती आलेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व प्रवासी हे शिर्डी येथे जाते होते.

मिळालेल्या माहितीनुसार,बेंगळुरूच्या कुडलो येथील रहिवासी नरेश व्यंकटेश (वय 35) हे आपल्या कार क्रमांक केए ५१ एमएक्स ८७६१ ने प्रयागराज ते नागपूर मार्गे शिर्डी जात होता. यावेळी नरेशसोबत त्याची पत्नी रमेश्री (वय ३२), बहिण शकुंतला (वय ५०), चालक नरेशचा मुलगा पूर्विक नरेश (वय ६ वर्ष), मित्र संजय नाझंया (वय ४०) कारमध्ये बसले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

SCROLL FOR NEXT