MNS viral video: मुंबईत परप्रांतियाकडून मराठी माणसाला मारहाण, मनसेनं दाखवला चांगलाच इंगा, VIDEO

Mumbai garment shop controversy: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मराठी कुटुंबाला परप्रांतिय गारमेंटच्या दुकानदारानं चोप दिला होता. यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अॅक्शन घेत चांगलाच चोप दिलाय.
MANSE
MANSESaam Tv News
Published On

धारावीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका मराठी कुटुंबाला परप्रांतिय गारमेंटच्या दुकानदारानं चोप दिला होता. याची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी यावर अॅक्शन घेतली. मनसे कार्यकर्त्यांनी गारमेंटच्या दुकानात जाऊन दुकानादाराला चांगलाच चोप दिलाय. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

धारावीत मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीनंतर एका गारमेंट दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच इंगा दाखवलाय. डोईफोडे यांच्या घरामध्ये लग्न कार्य होते. लग्न कार्य असल्यामुळे त्यांनी काही कपडे शिवण्यासाठी धारावी येथील एका गारमेंट दुकानदाराला दिले होते. मात्र, संबंधीत गारमेंट दुकानदार वेळेवर कपडे शिवून देत नव्हता.

MANSE
Viral News: ह्रदयद्रावक! कन्यादानानंतर बापाने सोडले प्राण, ह्रदयविकाराच्या झटक्यानं झालं निधन

१९ फेब्रुवारीला कपडे मिळतील असे सांगण्यात आले होते. वेळेवर कपडे देत नसल्यामुळे डोईफोडे कुटुंबाने दुकानात जात जाब विचारला. यादरम्यान, गारमेंट मालक आणि डोईफोडे कुटुंबामध्ये बाचाबाची झाली. नंतर दुकानातील कर्मचाऱ्यांनी मराठी कुटुंबातील काही व्यक्तींना मारहाण केली.

या मारहाणीनंतर डोईफोडे कुटुंबाने याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिली. मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी थेट धारावी येथील गारमेंट दुकान गाठले. दुकान गाठल्यानंतर त्यांनी दुकान मालकाला जाब विचारत मनसे स्टाईल इंगा दाखवला.

MANSE
Crime News: भयानक! दारू प्यायला, बंद खोलीत बलात्कार केला; बेशुद्ध अवस्थेत आढळली चिमुकली

या मारहाणीचा व्हिडिओ शुट करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. मराठी माणसाला झालेल्या मारहाणीत मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी मनसे स्टाईल गारमेंट मालकाला चांगलाच चोप दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com